लसीकरण केंद्रावर उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:21+5:302021-07-04T04:13:21+5:30
व्यापक स्वरूपात १८ ते ४४ वयोगटांतील प्रत्येकाने कोरोनापासून बचाव होण्याकरिता लस घेणे शासनाने बंधनकारक केले आहे. यामुळे १८ ते ...
व्यापक स्वरूपात १८ ते ४४ वयोगटांतील प्रत्येकाने कोरोनापासून बचाव होण्याकरिता लस घेणे शासनाने बंधनकारक केले आहे. यामुळे १८ ते ४४ वयोगटांतील प्रत्येक नागरिक लस घेण्यासाठी प्राथमिकतेने प्रयत्न करीत आहे; मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण केंद्रावर अफाट गर्दी दिसून येत आहे.
पोलिसांना ठेवावे लागले बंदोबस्त
एकीकडे प्रशासन डेल्टा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरिता पाचपेक्षा जास्त नागरिकांवर जमाबंदी करताना दिसून येत आहे. दुसरीकडे शेकडोंच्या संख्येने नागरिक एकाच केंद्रावर लसीकरण करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहे. यातून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. कोरोना लसीकरण केंद्र कोरोना पसरण्याचे निमित्त ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहेत. प्रत्येक नागरिक लसीकरणासाठी आपलाच नंबर लावा याकरिता धडपड करताना दिसत होते. अनेकांचे नंबरवरून वादसुद्धा झाल्याचे दिसून आले.
नियोजनाचा अभाव
डी. एस. हायस्कूलच्या एकाच केंद्रावर तब्बल चार ठिकाणी लसीकरण केंद्र करण्यात आले आहे. रजिस्ट्रेशनकरिता सहा संगणक यांचा वापर करण्यात येत आहे, तर एकूणच लसीकरणासाठी तब्बल १७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत होते. या केंद्रावर १४५० नागरिकांनी लस घेतली.
जितक्या लस केंद्रावर उपलब्ध आहे तितके लाभार्थी केंद्रावर असणे आवश्यक असताना मात्र त्याच्या दुपट्टीने नागरिक रांगेत उभे असतानाचे दिसून आले आणि त्यांना उन्हामुळे भोवळ येत होती. पाण्याची व्यवस्था नाही, तर इतर भौतिक सुविधांचाही अभाव दिसून आला.
केंद्रावर जितक्या लसी उपलब्ध असतील तितक्या नागरिकांना मोजून आतमध्ये प्रवेश दिला व आतमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवले तर नियोजन पूर्ण लसीकरण होऊ शकते यावर गंभीर ते पूर्वक शासनाने विचार करणे आवश्यक आहे.