सीटीस्कॅन करणाऱ्यांचे प्रमाण १० वरून ६० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:16 AM2021-04-21T04:16:39+5:302021-04-21T04:16:39+5:30
जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढली असून यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. यात कोरोनाची लागण झाल्यानंतर संसर्गाचे ...
जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढली असून यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. यात कोरोनाची लागण झाल्यानंतर संसर्गाचे प्रमाण किती प्रमाणात आहेत याचे निदान करण्यासाठी आता सीटीस्कॅनवर अधिक भर दिला जात असून हे प्रमाण एका केंद्रावर एका दिवसाला दहा वरून ६० टक्क्यांपर्यंत गेले आहे.
दरम्यान, सामन्यत: २५०० रुपयापर्यंत सीटीस्कॅनचे दर असून काही केंद्रांवर बाधित रिपोर्ट नसल्यास अधिकचे दर आकारले जात असल्याची स्थिती असून अशा काही तक्रारीही समोर आल्या आहेत. सीटीस्कॅनसोबतच रक्ताच्या चाचण्या करण्यांचे प्रमाणही वाढले आहे. प्रत्येक सीटीस्कॅन करणारा रुग्ण हा रक्ताच्या चाचण्याही सोबतच करीत आहे. लक्षणे कसेही असलेतरी अधिक रुग्णांचा कल हा सीटीस्कॅन व रक्ताच्या चाचण्यांकडे अधिक आहे.
दरम्यान, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रक्ताच्या चाचण्याही एका केंद्रावर आता आधीपेक्षा तीन ते चार पटीने अधिक होत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्ण नेमक्या कोणत्या स्थितीत आहेत. हे समजण्यासाठी या चाचण्या करणे महत्त्वाचे असल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.