चुंचाळे येथील विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक गोळा करून दिला स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 04:27 PM2019-09-29T16:27:41+5:302019-09-29T16:31:25+5:30
चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून सात गोण्या प्लॅस्टिक गोळा करून स्वच्छतेचा एक संदेश दिला आहे.
चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून सात गोण्या प्लॅस्टिक गोळा करून स्वच्छतेचा एक संदेश दिला आहे.
प्लॅस्टिक बंदी ही आजच्या काळाची गरज आहे. प्लॅस्टिकच्या वापराने आजाराला निमंत्रण मिळते. तसेच पाणी जमिनीत मुरण्यास प्लॅस्टिकचा अडथळा निर्माण होतो. प्लॅस्टिक जाळल्याने हवा प्रदूषित होते, अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी गावात प्लॅस्टिकच्या बाबतीत जनजागृती केली.
चुंचाळे व बोराळे या दोन्ही गावातील परिसर विद्यार्थ्यांनी पिंजून काढला आहे. तसेच महिलांना व गावातील पुरुषांना विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक ही कशी आपल्यासाठी घातक आहे आणि त्यामुळे आपले काय नुकसान होते हे समजावून सांगितले. त्यामुळे पालकांनी नागरिकांनी मान्य केले की, यापुढे प्लॅस्टिकचा वापर आम्ही करणार नाही.
या उपक्रमासाठी प्राचार्य व्ही तेली, शिक्षक डी.बी.मोरे, एस.एस.पाटील, वाय.पाटील, एम.पी.पाटील, एम.आर.चौधरी, एस.बी.गोसावी, पी.एस. सोनवणे, एन.जी.पाटील, सुधीर चौधरी तसेच शिक्षकेतर कर्मचारी आर.के.पाटील, ए.एस.कोडी, के.बी.धनगर, ए.बी.बोरसे सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.
गावातील व बोराळे येथील जमा झालेल्या सहा प्लॅस्टिकच्या गोण्या ग्रामपंचायतीच्या हवाली करण्यात आल्या. यावेळी सुकलाल राजपूत, सामाजिक कार्यकर्ते रहेमान तडवी, ग्रामपंचायत सदस्य, दलशेर तडवी आदी उपस्थित होते.