कढोली येथे विद्यार्थ्यांची घोड्यावरून मिरवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:54 PM2018-06-15T22:54:07+5:302018-06-15T22:54:07+5:30

जळगाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कढोली येथे १५ जून रोजी प्रवेशोत्सव साजरा झाला. यावेळी शाळेतील नवागत विद्यार्थ्यांची बैलगाडीवरून मिरवणुक, वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढण्यात आली.

Cuddles from students' hood at Kadoli | कढोली येथे विद्यार्थ्यांची घोड्यावरून मिरवणुक

कढोली येथे विद्यार्थ्यांची घोड्यावरून मिरवणुक

Next
ठळक मुद्देशिक्षणाधिकारी यांची उपस्थितीवृक्षदिंडीचे आयोजनमहिलांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले.

जळगाव : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कढोली येथे १५ जून रोजी प्रवेशोत्सव साजरा झाला. यावेळी शाळेतील नवागत विद्यार्थ्यांची बैलगाडीवरून मिरवणुक, वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढण्यात आली.
मिरवणुकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे.पाटील, उपशिक्षणाधिकारी डॉ.देवांग, विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी एन.एफ.चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास पाटील, प्रशांत गायकवाड, शैलजा पाटील यांच्यासह मुख्याध्यापक व नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक अजबसिंग पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अलका पाटील यांनी तर आभार दिनकर पाटील यांनी मानले. यावेळी वैशाली वाल्हे, संगीता देशमुख, स्वप्नील पाटील, कैलास पाटील उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांची घोडागाडी व सजविलेल्या बैलगाडीत मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. त्यानंतर मंडपात गोड मिष्टान्नाची पंगत देण्यात आली. पहिल्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

Web Title: Cuddles from students' hood at Kadoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.