संमेलनातून मिळाली सांस्कृतिक आणि साहित्यिक मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:53 AM2018-12-31T01:53:17+5:302018-12-31T01:54:17+5:30
मोठ्या संमेलनाबरोबर ग्रामीण भागात अशी छोट्या-छोट्या स्वरुपाची साहित्य संमेलने भरविणे ही काळाची गरज आहे, अशा संमेलनातून सांस्कृतिक आणि साहित्यिक मेजवानी मिळाली असल्याची भावना या साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेल्या साहित्यप्रेमी, वाचकांनी व्यक्त केली.
जामनेर, जि.जळगाव : मोठ्या संमेलनाबरोबर ग्रामीण भागात अशी छोट्या-छोट्या स्वरुपाची साहित्य संमेलने भरविणे ही काळाची गरज आहे, अशा संमेलनातून सांस्कृतिक आणि साहित्यिक मेजवानी मिळाली असल्याची भावना या साहित्य संमेलनासाठी उपस्थित असलेल्या साहित्यप्रेमी, वाचकांनी व्यक्त केली.
जामनेरात कित्येक वर्षांनी सांस्कृतिक, साहित्यिक अनुभव या संमेलनाच्या निमित्ताने अनुभवता आला. दिवसभरातील कार्यक्रर खूपच दर्जेदार होते. नवीन वर्षापासून असेच साहित्यिक कार्यक्रम व्हावेत हीच अपेक्षा.
- प्रा.शुभदा गारखेडकर, जामनेर
राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलन जामनेरला होणे ही भाग्याची गोष्ट आहे. या संमेलनातून साहित्यिक मेजवानी मिळाली. कार्यक्रमाच्या संयोजकांना विनंती की, असे दर्जेदार साहित्यिक कार्यक्रर वारंवार व्हावेत. सरत्या वर्षाची ही अनोखी भेटच मिळाली. यासाठी संमेलन आयोजकांचे आभार मानले पाहिजेत.
- भारती एम. सावखेडकर, जामनेर
तावडी बोली साहित्य संमेलनातून आपल्या नित्याच्या बोली भाषेविषयी नावीन्यपूर्ण माहिती मिळाली. ग्रामीण भागातील तावडी बोलीची माहिती नवीन पिढीला स्फूर्ती देणारी असून, ती संमेलनाच्या माध्यमातून मिळाली.
- डॉ. आशिष महाजन, जामनेर
मातृभूमीची मायबोली सातत्याने तेवत ठेवण्यासाठी व बोलीभाषेचा जागर करण्यासाठी झालेले तावडी बोली संमेलन अविस्मरणीय ठरले. ते स्मरणात राहील. यातून आपली तावडी किती समृध्द आहे याची प्रचिती आली.
- रमेश जाधव, जामनेर
बोलीभाषा ही त्या-त्या भागाची भाषिक संपत्ती आहे. यामुळे ग्रामीण भागात अशी संमेलने घेणे ही निश्चित स्वागतार्ह बाब आहे. यातून नवोदितांनाही व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
-किशोर पाटील कुंझरकर, एरंडोल