भडगाव तालुक्यातील गुढे येथे सांस्कृतिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 04:19 PM2019-02-05T16:19:07+5:302019-02-05T16:20:31+5:30
गुढे येथील कृष्णराव देवराव पाटील विद्यालयात आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
गुढे, ता.भडगाव, जि.जळगाव : येथील कृष्णराव देवराव पाटील विद्यालयात आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. चेअरमन उ.रा. पवार अध्यक्षस्थानी होते.
सकाळीच्या सत्रात प्रतिमा पूजन, सत्कार समारंभ पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांच्या अंगातील चार पैसे कमवायचे धाडस आणी व्यवसाय मार्गदर्शन म्हणून स्वत: बनवलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून त्यात व्यवसायाचा अभ्यास घेतला. या स्टॉलचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक तथा माजी सरपंच कृष्णराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पाव वडा, मुंग भजी, पोहे, कचोरी, समोसा, पाणीपुरी, खमण, आईस्क्रीम यासारखे पदार्थ विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवले होते. गावातील खवय्यांनी गर्दी केली होती. यावेळी संगीत खुर्ची, निंबू चमचा, मडके फोडणे यासारखे खेळ घेण्यात आले.
दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. उद्घाटन संस्थेचे व्हाईस चेअरमन विकास पाटील, चाळीसगाव मेडिकल असोशियनचे अध्यक्ष योगेश भोकरे, मुख्यध्यापक आर.व्ही.पिंगळे, ग्रामस्थ मोतीराम पाटील यांनी केले. रंग तारी, दारुबंदीबाबत जनजागृतीपर गाणी, नाटिका सादर करण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक आर.व्ही.पिंगळे, पर्यवेक्षक आर.एम.आहिरे, शिक्षक संजय शिनकर, पी.एल.कोळी, सुनील देशमुख आदी उपस्थित होते.