जळगाव जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी; पालकमंत्री गुलाबराव पाटलांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 06:45 PM2021-02-22T18:45:17+5:302021-02-22T18:45:59+5:30
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजपासून रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे.
जळगाव प्रतिनिधी दि. २२ :- जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजपासून रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. तर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेससह सार्वजनीक कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली असून याबाबतचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी आज जारी केले आहेत.