कनार्टक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात डॉ. मिलिंद बागूल यांचा काव्यसंग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 19:52 IST2020-10-07T19:52:22+5:302020-10-07T19:52:44+5:30

जळगाव : आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचे पर्यवेक्षक तसेच सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल यांच्या 'संदर्भ माझ्या जातीचे' ...

In the curriculum of Karnataka University, Dr. A collection of poems by Milind Bagul | कनार्टक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात डॉ. मिलिंद बागूल यांचा काव्यसंग्रह

कनार्टक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात डॉ. मिलिंद बागूल यांचा काव्यसंग्रह

जळगाव : आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचे पर्यवेक्षक तसेच सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागूल यांच्या 'संदर्भ माझ्या जातीचे' हा कवितासंग्रह कर्नाटकच्या धारवड विद्यापीठात मराठी विभागाच्या बी.ए. बी.कॉम. बी.बी.ए. वर्गाच्या तिसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.

डॉ. मिलिंद बागुल यांचा हा कवितासंग्रह या अगोदर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम. ए. मराठी भाग-२ च्या अभ्यासक्रमात समाविष्ट होता. या कवितासंग्रहातील समता ही कविता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बी.ए.प्रथम वर्षाच्या महाविद्यालयीन मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट असून त्यांची शंकरराव खरात कथात्म वाङ्‍‍मय संपादित फ. मुं. गजबजलेलं गाव, हमालपुरा ते कुलगुरू ही पुस्तके प्रकाशित झाली आहे.

Web Title: In the curriculum of Karnataka University, Dr. A collection of poems by Milind Bagul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.