बनावट दारु प्रकरणात संशयितांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:49 AM2021-01-08T04:49:26+5:302021-01-08T04:49:26+5:30
जळगाव : बनावट दारु निर्मिती प्रकरणात अटकेत असलेल्या गणेश भाऊराव कोळी (२४, रा.शिरपूर), सुखदेव पूनमचंद पवार (३०,रा.चिखली, ता.शहादा), गणेश ...
जळगाव : बनावट दारु निर्मिती प्रकरणात अटकेत असलेल्या गणेश भाऊराव कोळी (२४, रा.शिरपूर), सुखदेव पूनमचंद पवार (३०,रा.चिखली, ता.शहादा), गणेश हिरालाल सोनवणे (२८,रा.अयोध्या नगर), सियाराम हरीराम पावरा (१९,रा.शिव कॉलनी) व भाईदास शिवला पावरा (१८,रा.धरबापाडा,मोराडी, ता. शिरपूर) या पाचही जणांना मंगळवारी न्यायालयाने ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी एमआयडीसीला लागून असलेल्या मन्यारखेडा शिवारात पार्टेशनच्या घरात सुरु असलेला बनावट दारु निर्मितीचा कारखाना उद्वस्त केला होता. भरारी पथकाचे निरीक्षक चंद्रकांत पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
बलात्कार प्रकरणात संशयिताला कोठडी
जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार व अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमीत आदीनाथ गायकवाड (२१, रा.बाणगाव, ता.चाळीसगाव) याला न्यायालयाने मंगळवारी ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अमीत याला ४ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. मंगळवारी न्या.आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.