ग्राहकांना घरबसल्या तक्रार व वीज बिल भरता येणार
By admin | Published: April 9, 2017 12:33 PM2017-04-09T12:33:55+5:302017-04-09T12:33:55+5:30
महावितरण कंपनीच्या वीजबिलांचे स्वरूप बदलले असून ग्राहकांना वीजबिले ही नवीन स्वरूपातील वितरित केली जाणार आह़े
Next
जळगाव,दि.9- नवीन आर्थिक वर्षापासून महावितरण कंपनीच्या वीजबिलांचे स्वरूप बदलले असून ग्राहकांना एप्रिल महिन्याची सर्व वीजबिले ही नवीन स्वरूपातील वितरित केली जाणार आह़े या बिलांवरील क्युआरकोडमुळे ग्राहकांना तक्रारी, वीजबिल भरणा यासह इतर ऑनलाईन सुविधांचा लाभ घेता येणार आह़े या सेवेच्या माध्यमातून महावितरणने डिजिटलकडे आणखी एक पाऊल टाकले आह़े
असे असेल नवीन वीजबिल
नवीन आर्थिक वर्षापासून सर्व ग्राहकांना गुलाबी रंगाचे व मराठी भाषेत छापलेले वीजबिल महावितरणकडून पाठविले जाणार आह़े या वीजबिलावरील नाव, पत्ता, देय रक्कम, बिलिंग युनीट, पीसी, चक्र , मंजूर भार, रिडिंगच्या तारखा, मीटरचा फोटो या सर्व गोष्टी नवीन स्वरुपात असणार आह़े जिल्हा पातळीवर तक्रार निवारण कक्ष व परिमंडळ पातळीवर ग्राहक तक्रार निवारण मंच या दोघां ठिकाणचे पत्ते व फोन क्रमांक बिलावर असणार आहेत़ बिलाच्या सर्वात शेवटी विशेष संदेश राहणार असून त्याव्दारे सुरक्षा ठेव थकीत यासह कंपनीच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आह़े
स्मार्टफोन असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर
दिवसेंदिवस नागरिकांकडून अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब केला जात आह़े त्यानुसार स्मार्टफोनचा वापर करणा:या ग्राहकांमध्येही वाढ झाली आह़े यालाच अनुसरून महावितरण कंपनीतर्फे नवीन वीजबिलावर क्युआरकोड छापला जाणार आह़े या क्युआरकोडमुळे स्मार्टफोन असलेल्या ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन वीजबील भरणा, तक्रारी या सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आह़े
कसे वापरणार क्युआरकोड
वीजबिलाच्या उजव्या बाजूला क्युआरकोड असेल़ ग्राहकांनी स्मार्टफोनमध्ये क्युआरकोड कोड स्कॅनिंगचे अॅप डाऊनलोड कराव़े या अॅपव्दारे बिलावरील क्यूआरकोड स्कॅन करावा़ यानंतर थेट महावितरण कंपनीच्या अॅपव्दारे ग्राहकाला बिलासंबंधी तक्रार करणे, वीजबिलाचा भरणा करणे, योजनांची माहिती या सर्व ऑनलाईन सुविधांचा सहजपणे लाभ घेता येणार आह़े