बँकेसमोर ग्राहकांची तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 02:05 PM2020-04-03T14:05:09+5:302020-04-03T14:05:15+5:30

कोरोनाबद्दल बेफिकीरी : सामाजिक अंतराची ऐसी तैसी

Customers face the crowd before the bank | बँकेसमोर ग्राहकांची तोबा गर्दी

बँकेसमोर ग्राहकांची तोबा गर्दी

Next

फैजपूर, ता. यावल : पंतप्रधानांपासून ते गाव पातळीवर सर्वच जण कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. मात्र गावकरी काही ऐकायला तयार नाहीत. सोशल डिस्टन्ससिंगची (सामाजिक अंतर) तर त्यांनी ऐसी की तैसी करून ठेवली आहे. बँकांच्या समोर तर ग्राहकांनी कहरच केल्याचे दिसून आले. शेवटी पोलिसांना येऊन ग्राहकांना सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना द्याव्या लागत आहे.
शहरातील युनियन बँकेसमोर ही स्थिती निर्माण झालेली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बँक बंद असल्याने शुक्रवारी बँक उघडताच ग्राहकांनी व्यवहार करण्यासाठी एकच गर्दी केली. शहरातील सुभाष चौकात असलेल्या युनियन बँकेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी जमली होती. बँकेत एकावेळी केवळ चारच ग्राहकांना सोडण्यात येत होते. मात्र बँके बाहेर ग्राहक एकमेकांना खेटून उभे होते. त्यांना ना कोरोनाची भीती ना चिंता होती. त्यातच जनधन खात्यामध्ये आलेली रक्कम काढणाऱ्यांची त्यात भर पडली होती.शेवटी पोलिसांनी ग्राहकांची गर्दी पांगवली वसुरक्षित अंतरावर उभे करून व्यवहार करण्याच्या सूचना केल्या.

Web Title: Customers face the crowd before the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.