जामनेर तालुक्यातील झोपडी तांडा येथे कापूस मोजणीत मापात पाप करणाऱ्यांना चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 09:50 PM2019-02-23T21:50:00+5:302019-02-23T21:50:13+5:30
परिसरात चर्चेला उधाण
शेंदुर्णी, ता.जामनेर - येथून जवळच असलेल्या झोपडी तांडा येथे कापूस मोजणीत मापात पाप करणा-या कापूस व्यापा-याच्या मजुरांना गावक-यांनी चोप दिला. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
झोपडी तांडा येथील भिला मोरसिंग जाधव यांच्याकडे प्रति क्विंटल पाच हजार चारशे रुपये भावाने कापसाचा भाव ठरवून मोजणी करायला सुरुवात झाली. इतर व्यापारी ५३०० रुपयाचा भाव देत असल्याने शेतकरी प्रति क्विंटल १०० रुपये आपल्याला जास्त भाव मिळत आहे, या खुशीत होता. बघता बघता घरातील अर्धा कापूस संपला. त्याने मोजून ठेवलेल्या कापसाबाबत संशय आल्याने कापूस मोजणी लक्षपूर्वक पाहिली असता मापात काहीतरी घोळ असल्याचे लक्षात आले. मोजणी सुरू असताना तोल थांबवत गावकºयांसमोर मोजणी केली असता एका तोल मागे तीन किलो कापूस जास्त टाकून लुबाडणूक करत असल्याचे लक्षात आले. या वेळी शेंदुर्णीतील कापूस व्यापाºयाच्या माणसांना झोपडी तांडा येथील शेतकºयांनी चांगलाच चोप दिला.
संबंधित तोल काट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी पोलीस मात्र या घटनेबाबत अनभिज्ञ आहेत.