दररोज सायकल चालवा आणि तंदुरुस्त रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 09:51 PM2019-11-26T21:51:02+5:302019-11-26T21:51:17+5:30

जळगाव : सायकल हा सोपा आणि शरिराच्या सर्व भागांची हालचाल करणारा व्यायाम आहे. नियमित सायकल चालविण्याने सकाळी एक नवी ...

 Cycle daily and stay fit | दररोज सायकल चालवा आणि तंदुरुस्त रहा

दररोज सायकल चालवा आणि तंदुरुस्त रहा

Next

जळगाव : सायकल हा सोपा आणि शरिराच्या सर्व भागांची हालचाल करणारा व्यायाम आहे. नियमित सायकल चालविण्याने सकाळी एक नवी ऊर्जा मिळते. त्यामुळे आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी दररोज सायकल चालवा आणि तंदुरुस्त रहा, असे आवाहन शहरातील नियमित सायकल चालविणाऱ्या नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.
गेल्या आठवडाभरापासून थंडीचे प्रमाण वाढल्याने शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर सायकल चालविणाऱ्यांची देखील गर्दी दिसून येत आहे. अनेक नागरिक हिवाळ्यात सायकलिंगचा आनंद लुटतात. शहरातील शिरसोली रस्ता, औरंगाबाद रस्ता व नशिराबाद रस्त्यावर सकाळपासूनच नागरिक सायकल चालवित आहेत.
शारिरीक स्वास्थासाठी हिवाळा हा ऋतू महत्वाचा मानला जात असल्याने अनेक युवकांसह वयोवृद्ध नागरिकदेखील आवडीने सायकल चालवित असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे साध्या सायकलपेक्षा अनेकांकडे रेंजर सायकल दिसून येत आहे. ही सायकल वजनाने हलकी आणि चालवायलाही तरल असल्याने यामुळे लवकर थकत नसल्याचे तरुणांनी सांगितले. कॉलेजला जाण्यासाठी दररोज सायकल चालविणे होतेच, मात्र हिवाळ््यात सकाळी-सकाळी सायकल चालविणे, खूप फायदेशीर व्यायाम असल्यामुळे पंधरा दिवसापासून दररोज २० किलोमीटर सायकल चालवित असल्याचे योगेश पाटील या युवकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

सायकल चालविण्याचे फायदे
-नियमित सायकल चालविल्याने शरिराच्या सर्व अवयवांची हालचाल होऊन, शरीर तंदुरुस्त राहते.
- मानदुखी, पाठदुखीचा त्रास दूर होतो.
-सकाळी-सकाळी सायकल चालविल्याने ताणतणाव दूर होऊन, ताजेतवाने वाटते.
-शरिरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
-मधुमेह, संधिवात, लठ्ठपणा या आजारांवर नियंत्रण मिळविता येते.
-सर्वांत महत्वाचे म्हणजे वजन कमी करण्यासाठी सायकलिंग खूप फायदेशीर आहे.
-नियमित सायकल चालविल्याने शरिरातील स्नायू बळकट होऊन, पायांची कार्यक्षमताही वाढते.

Web Title:  Cycle daily and stay fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.