बोली भाषा संवर्धनासाठी सायकलने देशभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:00 PM2019-08-11T12:00:00+5:302019-08-11T12:00:14+5:30

२० हजार किमीचा प्रवास

Cycle patriotism for spoken language promotion | बोली भाषा संवर्धनासाठी सायकलने देशभ्रमंती

बोली भाषा संवर्धनासाठी सायकलने देशभ्रमंती

Next

सचिन देव
भारतात असंख्य भाषा बोलल्या जातात. प्रत्येक प्रातांची भाषा ही वेगवेगळी आहे. संस्कृतीचा वारसा जपण्यात भाषेचे अनन्य साधारण महत्व आहे. देशभरातील बोलीभाषांच्या प्रसारासाठी गेल्या वर्षांपासून सायकलवरुन देशभ्रमंती यात्रा सुरु केली आहे, अशी माहिती डोंबिवलीतील गंधार कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात ते शुक्रवारी जळगावला आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न : बोली भाषांच्या अभ्यासासाठी सायकलवरुन देशभ्रमंती यात्रा कधी सुरु झाली आणि कधी संपणार आहे ?
उत्तर : गेल्या वर्षी १ जुलैला सायकलने देशभ्रमंतीला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात डोंबिवलीहून नागपूर, नागपूरहून मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब व गुजरात केले. तर आता दुसऱ्या टप्प्यात कर्नाटक, केरळ, तामीळनाडू व इतर राज्य करुन महाराष्ट्रात आलो आहे. येत्या १५ आॅगस्टला या देशभ्रमंतीची सांगता होईल.
प्रश्न : सायकलवारीतून बोली भाषांचा कशा प्रकारे अभ्यास करत आहात?
उत्तर : या देशात असंख्य भाषा आणि बोलीभाषा असल्यामुळे, भारत देश हा भाषिकदृष्टया श्रीमंत मानला जातो. प्रत्येक बोलीहीं भाषेला समृद्ध करत असते. सायकलवरुन देशभ्रमंती करत असतांना, रस्त्यात लागणाºया गावकऱ्यांशी चर्चा केली. तेथील महाविद्यालयांना भेटी देऊन, विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तेथील बोलीभाषा व मातृभाषेविषयी माहिती घेतली. तसेच संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी प्रत्येकाने बोलीभाषा जपली पाहिजे, दैनंदिन व्यवहार करताना प्रत्येकाने बोली भाषेचाच वापर करावा.
प्रवासात काही अडचणी अल्या का?
केलेल्या नियोजननुसार सर्व प्रवास आता पर्यंत सुरळीत पार पडत आहे. सायकलवरुन देशभर फिरल्यामुळे, सायकलचा प्रत्येक पार्ट बदलावा लागला. यापुढे आता भाषेवरच अभ्यास करायचा असून, बोली भाषंचा प्रसार, महत्व विद्यार्थ्यांना पटवून द्यायचे आहे. तसेच या विषयात पीएचडी करण्याचा मानस आहे.
दररोज किती किलोमीटरचा प्रवास असायचा ?
दररोज ८० ते १२० किलोमीटरचा प्रवास असायचा. भ्रमंतीवर निघतानांच प्रवास, राहण्याचे व शिदोरीचे नियोजन केले होते. महाराष्ट्रात व इतर राज्यांमध्ये फरक करायचा झाला तर, महाराष्ट्र शिक्षणासह इतर सर्व क्षेत्रात खूप पुढे आहे. मात्र, रस्त्यांच्या बाबतीत महाराष्ट्राची खुप मागे असलेला दिसून आला.

Web Title: Cycle patriotism for spoken language promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव