सायकलवर चालणारे बहुपयोगी यंत्र
By admin | Published: March 20, 2017 12:40 AM2017-03-20T00:40:52+5:302017-03-20T00:40:52+5:30
दहीगावच्या विद्याथ्र्याचा आविष्कार : मुख्यमंत्री, राज्यपालांकडून गौरव
दहीगाव, ता.यावल : नावीन्याचा ध्यास घेत जळगावच्या एसएसबीटीच्या विद्याथ्र्यानी सायकलवर चालणारे कृषी यंत्र बनवले आह़े त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी. विद्यासागर आदींच्या हस्ते या विद्याथ्र्याचा नुकताच सत्कार करण्यात आला़
शेती व्यवसाय जुगार ठरू पाहत असल्याने व त्यातील सर्वात मोठी अडचण पैसा, अवजारे हे पाहता सायकलवर चालणारे बहुपयोगी कृषी यंत्र तयार करण्याचा ध्यास घेत जळगावच्या एस.एस.बी.टी. या तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील यंत्र विभागातील अनिकेत आवारे, विनय मुळे, अंकित शिरसाळे, महेश साहेबराव तेली (दहीगाव), आश्विन ठक्कर या पाच विद्याथ्र्यानी बहुपयोगी कृषी यंत्र निर्माण केल़े हे यंत्र निर्माण करण्यासाठी प्रा.एम.व्ही. रावलानी यांचे मार्गदर्शन लाभले. नावीन्यपूर्ण प्रयोग करून गरीब शेतक:यांच्या उपयोगात येणारे हे बहुपयोगी यंत्र निर्माण करणा:या पाचही विद्याथ्र्याचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. (वार्ताहर)
या यंत्राच्या माध्यमातून शेती मशागत व बी पेरणीदेखील शक्य आहे. शिवाय फवारणी तसेच गहू ज्वारी, मका, बाजरी यांची कापणी करता येईल. हे यंत्र सायकलसारखे चालवित नेण्याची सोय आह़े फवारणी व बी पेरणीचा एक भाग आणि रोटाव्हेटर कापणीसाठीचा दुसरा भाग उपयोगात येतो. हे दोघं भाग जोडल्यावर सायकल तयार होते व ती कोठेही चालवत नेता येत़े