भुसावळ रेल्वेस्थानकावर रेल्वे कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 01:37 AM2019-12-17T01:37:01+5:302019-12-17T01:37:06+5:30

रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक दोन-तीनवर असलेल्या फूड ट्रक आयआरसीटीसीच्या केएमए कॅटर्स रसोई घरमध्ये खाद्यपदार्थ बनवत असताना अचानक सिलेंडरचा भडका उडाल्याने स्थानकावर खळबळ उडाली.

Cylinder blast to railway canteen at Bhusawal railway station | भुसावळ रेल्वेस्थानकावर रेल्वे कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा भडका

भुसावळ रेल्वेस्थानकावर रेल्वे कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा भडका

Next




मोठी दुर्घटना टळली : सुरक्षेचा विषय ऐरणीवर


भुसावळ : २४ तास गजबजलेल्या रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक दोन-तीनवर असलेल्या फूड ट्रक आयआरसीटीसीच्या केएमए कॅटर्स रसोई घरमध्ये खाद्यपदार्थ बनवत असताना अचानक सिलेंडरचा भडका उडाल्याने स्थानकावर खळबळ उडाली. घटना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षिततता ऐरणीवर आली आहे.
मध्य रेल्वेचा आत्मा असलेला भुसावळ विभाग व भुसावळ विभागाचा हृदय समजला जाणारा भुसावळ स्थानकावर १६ रोजी दुपारी एकच्या सुमारास आयआरसीटीसी फुड ट्रॅक केएमएफुट कॅटर्सच्या क्रमांक दोन व तीन मध्यभागी व प्रवाशांच्या अगदी दादऱ्यासमोर व लिफ्टच्या भिंतीला लागून असलेल्या रसोई घरात गरम करत असताना अचानक सिलेंडर ने भडका घेतला घटना समजताच स्थानकावर एकच खळबळ उडाली आगीमुळे घटनास्थळी संपूर्ण धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये आणखीनच घबराट पसरली होती ,कॅन्टीन मधील कर्मचारी यांनी एकूण ८ फायर एक्सटेंशनच्या सहाय्याने व गाडीत पाणी भरणाºया नळीच्या सहाय्याने आग त्वरित आटोक्यात आणली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्टेशन निर्देशक जी. आर. अय्यर, स्टेशन आरपीएफ निरीक्षक दिनेश नायर, कॅन्टीन निरीक्षक शकील शेख, विभागाचे किरण ठाकूर, शैलेश पारे, विद्युत विभागाचे शेख अश्पाक, आदींनी त्वरित घटनास्थळ गाठून जागेची पाहणी केली. वस्तुस्थिती समजून घेतली.
दरम्यान, २४ तास १३० प्रवासी गाड्या ये-जा करणाºया प्रवाशांनी सतत वर्दळ असलेल्या रेल्वेस्थानकावर सिलेंडरचा भडका उडाल्याने सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती शहरांमध्ये वाºयासारखी पसरताच स्थानकावर गावी जाण्यासाठी आलेल्या प्रवासांच्या आप्तेष्टांनी लगेच स्थानकावरील प्रवाशांची झालेल्या घटनेबद्दल माहिती जाणून घेतली व शहानिशा केली व मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांचा व नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला.
घटनेचे गांभीर्य पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
रेल्वेस्थानकावर सिलेंडरचा भडका झाल्याची माहिती समजतात अप्पर मंडल रेल प्रबंधक मनोज सिन्हा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के.शर्मा, वाणिज्य व्यवस्थापक अरुणकुमार, सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच ज्या ठिकाणी भडका उडाला उडाल्याने लाकडी आकोडा असलेले लाकडी साहित्य जळाले तसेच विद्युत बोर्ड वायरिंग व बोर्ड यांना पण आगीचा भडका लागला होता. रसोई घराला सील करण्यात आले.

घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य बघून सखोल चौकशी केली जाईल. चौकशीअंती जो कोणी दोषी असेल त्याच्यावर सक्तीची कारवाई करण्यात येईल.
-आर.के.शर्मा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, भुसावळ

Web Title: Cylinder blast to railway canteen at Bhusawal railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.