सिलिंडरच्या स्फोटात लग्नाचे दागिने, पैसे खाक

By admin | Published: January 11, 2017 12:26 AM2017-01-11T00:26:18+5:302017-01-11T00:26:18+5:30

जळगाव : बंद घरातील गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट होवून दोन घरांचा अक्षरश: कोळसा झाला

Cylinder bomb blasts, wedding gems, money | सिलिंडरच्या स्फोटात लग्नाचे दागिने, पैसे खाक

सिलिंडरच्या स्फोटात लग्नाचे दागिने, पैसे खाक

Next


जळगाव : बंद घरातील गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट होवून दोन घरांचा अक्षरश: कोळसा झाला तर अन्य दोन घरांचेही नुकसान झाले. या आगीत एका कुटुंबाने मुलीच्या लगAासाठी जमविलेली दोन लाख 35 हजार रुपये रोकड आणि दुस:या कुटुंबात मुलाच्या लग्नासाठी जमविलेली दीड लाखांची रोकड, दागिने, संसारोपयोगी वस्तू खाक झाल्या. आपल्या मुलांच्या लग्नाची  तयारी करीत असलेली ही दोन्ही कुटुंब मध्यमवर्गीय, मोलमजुरी करणारी असून, त्यांच्यावर कोसळलेल्या या  संकटामुळे ते अडचणीत आले आहेत. सुप्रीम कॉलनीतील खुबा नगरात मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
 अग्निशमन दलाच्या दोन बंबाद्वारे आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. नजीर गफुर पटेल, जैनुरबी सायबु तडवी, शाकीर अली युसूफ अली व कलीम हाफीज देशमुख या चार जणांच्या घराला आग लागली. त्यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पक्क्या घराच्या खिडक्या, दरवाजे जळाले
शाकीर अली युसुफ अली हे मेहरुणमध्ये                      तर कलीम हाफीज देशमुख हे बाजार समितीकडे राहतात, मात्र दोघांची घरे खुबा नगरात आहेत. या              घरात कोणी राहत नसले तरी दोन्ही घरांचे                     किरकोळ नुकसान झाले आहे. शकील अली                       यांच्या घराचे खिडकी, दरवाजा व अन्य वस्तू                जळाल्या आहेत तर देशमुख यांचेही पार्टेशनचे घर जळाले आहे. दोघांचे प्रत्येकी 50 हजाराच्यावर नुकसान झाले आहे. शकील सलेम पटेल या महिलेच्या घरालाही आगीची झळ बसली आहे. त्यांचे 20 ते 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
तलाठीकडून पंचनामा
आगीची घटना समजल्यानंतर तलाठी वैशाली पाटील यांनी नुकसानीचा पंचनामा केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक विजय आढाव, रामकृष्ण पाटील यांच्यासह कर्मचा:यांनी भेट देवून पाहणी केली व जळालेले सिलिंडर तसेच नोटा ताब्यात घेतल्या. महिनाभरात आगीच्या अनेक घटना घडल्या. सुदैवाने जीवित हानी टळत आहे मात्र लाखोचे नुकसान होत आहे.

जैनुरबी यांच्या संसाराची राख रांगोळी
जैनुरबी यांच्या पतीचे निधन झाले आहे. ते आश्रमशाळेत नोकरीला होते. त्यांच्या पेन्शनची 2 लाख 35 हजार रुपये रोकड व मुलगी रुकसाना हिचे यंदा लगA करावयाचे असल्याने तिच्यासाठी 4 तोळे चांदी, 6 ग्रॅम सोने व भांडे घेतलेले होते. या आगीत या सर्व वस्तू खाक झाल्या. यात 30 ते 35 हजार रुपये किमतीच्या शंभराच्या अर्धवट जळालेल्या नोटा घटनास्थळावर मिळाल्या. जैनुरबी यांच्या घराचेही बांधकाम सुरु आहे. टि.व्ही., होम थिएटर, गॅस सिलिंडर, धान्य, गादी, पलंग, भांडी, कपडे, कपाट आदी वस्तू खाक झाल्या. जैनुरबी या यावल तालुक्यात बहिणीकडे लगAाला गेल्या होत्या. आगीची घटना कळाल्यानंतर त्या तातडीने जळगावात दाखल झाल्या. मुलीच्या लगAासाठी जमविलेला पैसा काही क्षणात खाक झाल्याने जैनुरबी या प्रचंड भेदरलेल्या होत्या. शेजारील नागरिक त्यांना धीर देत होता.


तरुणाने काढले पेटते सिलिंडर बाहेर
आगीपासून संभाव्य धोका लक्षात घेता अल्ताफ पटेल या तरुणाने जीवाची पर्वा न करता पेटते सिलिंडर बाहेर काढले व पाण्याचा मारा करुन विझविले. यासह जाकीर पटेल, आबेद पटेल, नजीर कालु पटेल, गनी युसुफ पटेल, शफी सलीम पटेल, शफीक बागवान, शफीक पटेल यांच्यासह परिसरातील तरुणांनी शर्तीचे प्रय} करुन आग आटोक्यात आणली. त्यामुळे शेजारच्या घरांना धोका टळला.


औद्योगिक वसाहतीत कंपनीला आग
औद्यागिक वसाहतीत जैन अॅग्रो इंडस्ट्रीज या प्लास्टीक कंपनीला मंगळवारी दुपारी साडे चार वाजता अचानक आग लागली. या आगीत जीवीत हानी झाली नाही. शेजारील कंपनीतील कामगार व अगिAशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली.आगीचे कारण व नुकसान याबाबत ठोस माहिती सांगता येणार नसल्याची माहिती कंपनीचे मालक अभय विजय मुथा यांनी दिली. मुथा यांची ई सेक्टरमधील 42 क्रमांकाच्या प्लॉटमध्ये असलेल्या            जैन अॅग्रो इंडस्ट्रीज या नावाने कंपनी आहे. रोपे बनविण्यासाठी लागणारे प्लास्टीकचे ट्रे या कंपनीत तयार होतात. गेल्या काही दिवसापासून उत्पादन बंद होते. त्यामुळे कंपनीत कामगार नव्हते. मंगळवारी दुपारी साडे चार वाजता गोदामातून धूर निघत असल्याचे वॉचमन विजय तायडे व शेजारच्या कामगारांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने मालक मुथा यांना या घटनेची माहिती देवून मिळेल तेथून पाणी आणून आग विझवायला सुरुवात केली. अगिAशमन दलाचेही दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले.एक तासाच्या प्रय}ाने आग आटोक्यात आली.

मुलाच्या लगAाचा सामान खाक
नजीर पटेल यांचा मुलगा जाकीर याचे यंदा लगA करण्याची तयारी सुरु होती. त्यासाठी दीड लाख रुपये रोख व सुनेसाठी 8 ग्रॅमचे सोने घेवून ठेवले होते. शिवाय फ्रीज, कुलर, टी.व्ही.,गादी, भांडी, धान्य, पाण्याच्या टाक्या यासह संसारासाठी लागणारा सर्व सामान खाक झाला आहे.

Web Title: Cylinder bomb blasts, wedding gems, money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.