दहीहंडी खाली पडून तीन - चार जखमी; जामनेर येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 08:27 PM2024-08-30T20:27:43+5:302024-08-30T20:28:19+5:30

मोहन सारस्वत जामनेर  (जि.जळगाव) : जामनेर येथे शुक्रवारी सायंकाळी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी मोठ्या ...

Dahihandi fell down and injured three-four; Incident at Jamner  | दहीहंडी खाली पडून तीन - चार जखमी; जामनेर येथील घटना 

दहीहंडी खाली पडून तीन - चार जखमी; जामनेर येथील घटना 

मोहन सारस्वत

जामनेर  (जि.जळगाव) : जामनेर येथे शुक्रवारी सायंकाळी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी मोठ्या क्रेनला बांधलेली दहीहंडी खाली पडली. यात  तीन ते चार तरुण जखमी झाले आहेत.

जखमीना तातडीने येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.  नगरपालिका चौकात शुक्रवारी सायंकाळी ६:३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुंबई येथून आलेल्या कलावंतानी गणेश वंदना सादर केली. कार्यक्रम सुरु होण्याआधीच दहीहंडी खाली पडली. यात  तीन ते चार जण जखमी झाले आहेत.

Web Title: Dahihandi fell down and injured three-four; Incident at Jamner 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.