डाळ व्यापाऱ्यांची ४५ लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:15 AM2021-04-12T04:15:07+5:302021-04-12T04:15:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगावातील सात व्यापाऱ्यांना ४५ लाख ६६ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या नीलेश वल्लभाई सुदाणी (वय ...

Dal traders cheated of Rs 45 lakh | डाळ व्यापाऱ्यांची ४५ लाखात फसवणूक

डाळ व्यापाऱ्यांची ४५ लाखात फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगावातील सात व्यापाऱ्यांना ४५ लाख ६६ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या नीलेश वल्लभाई सुदाणी (वय ३९ रा. वराछा, सुरत) याला एमआयडीसी पोलिसांनी सुरत येथून अटक केली. त्याला रविवारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

रमेशचंद्र तेजरात जाजू (वय ६३ रा. गणपतीनगर)‌ व्यापाऱ्याकडून डाळ मागवून मालापोटीचे १६ लाख ८९ हजार ९५० पैसे न देता जाजू यांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होता. यात संशयितांनी विविध मोबाईल तसेच नंबर तसेच वेगवेगळे नावे गुन्हा करतांना वापरल्याने गुन्हयात आरोपींची संख्या वाढली होती. फसवणुकीचा आकडा हा ४५ लाख ६६ हजार ८८८ रुपयांच्या घरात आहे.

यांची झाली फसवणूक

रमेशचंद्र जाजू यांच्याबरोबरच सिध्दार्थ जैन यांची २ लाख ६३ हजार ९७० रुपयात, सत्यनारायण रामप्रसाद बाल्दी यांची २ लाख ३७ हजार, दिनेश रामविलास राठी यांची ९ लाख ३६ हजार ९० रुपये, पुष्पक अरविंद मणियार यांची १ लाख ३१ हजार १५ रुपये, अविनाश कक्कड यांची २ लाख ७० हजार व किशोरचंद चंचलचंद भंडारी यांची १० लाख ३८ हजार ८६३ रुपये अशा पध्दतीने या सात व्यापाऱ्यांची एकूण ४५ लाख ६६ हजार ८८८ रुपयांत फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ज्या संशयितांनी व्यापाऱ्याकडून दाल मागवून त्याचे पैसे दिले नाही. त्यांनी खोटे नाव, पत्त सांगून जळगाव येथील व्यापाऱ्यांशी व्यवहार केला. जळगावातील व्यापाऱ्यांनी माल पाठविल्यानंतर तो मिळाल्यावर संबंधित संशयितांनी त्यांचे मोबाईल तसेच सुरतमधील दुकाने बंद करुन पोबारा केला होता.

Web Title: Dal traders cheated of Rs 45 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.