दालमिल व्यापाऱ्याची १९ लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:23 AM2021-02-23T04:23:54+5:302021-02-23T04:23:54+5:30

जळगाव : दालमिल व्यापारी रमेशचंद तेजराज जाजु (वय ६३, रा. गणपती नगर ) यांची सुरतच्या व्यापाऱ्याने १९ लाख ७८ ...

Dalmil trader cheated for Rs 19 lakh | दालमिल व्यापाऱ्याची १९ लाखात फसवणूक

दालमिल व्यापाऱ्याची १९ लाखात फसवणूक

Next

जळगाव : दालमिल व्यापारी रमेशचंद तेजराज जाजु (वय ६३, रा. गणपती नगर ) यांची सुरतच्या व्यापाऱ्याने १९ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी परिसरात रमेशचंद जाजु यांच्या आर. सी. फुड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व आदर्श कमर्शियल कार्पोरेशन या दोन कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून जिल्हा तसेच परराज्यात चणा व तूरडाळ ते निर्यात करतात. यासोबतच खरेदीचाही त्यांचा व्यवसाय आहे. पैशांचा व्यवहार हा ऑनलाईन होतो. सुरत येथील मुकेश देवशीभाई कथारोटिया यांच्याशी तूर व चणाडाळ व्यापाऱ्याकरिता ऑनलाईन व्यवहार २७ डिसेंबर २०२० रोजी झाला होता. त्यानंतर वेळोवेळी व्यवहार करून ठरलेली रक्कम पाठवित होते. त्यानुसार रमेशचंद जाजु यांनी १९ लाख ७८ हजार ५४० रुपयांची चणा व तूरडाळ त्यांना पाठविली. मात्र, मुकेश कथारोटिया यांनी पैसे पाठविले नाही. त्यानंतर मोबाईलच बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जाजु यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन मुकेश कथारोटिया यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.

--

Web Title: Dalmil trader cheated for Rs 19 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.