अज्ञाताने कपाशी पिकावर तणनाशक फवारल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:12+5:302021-06-18T04:12:12+5:30

सातगाव डोंगरी शिवारात ईश्वर पाटील यांचे शेत असून, ते कपाशी लावलेल्या शेतात ज्या ठिकाणी खाडे पडलेले आहेत, त्या ठिकाणी ...

Damage caused by unknown spraying of herbicides on cotton crop | अज्ञाताने कपाशी पिकावर तणनाशक फवारल्याने नुकसान

अज्ञाताने कपाशी पिकावर तणनाशक फवारल्याने नुकसान

Next

सातगाव डोंगरी शिवारात ईश्वर पाटील यांचे शेत असून, ते कपाशी लावलेल्या शेतात ज्या ठिकाणी खाडे पडलेले आहेत, त्या ठिकाणी बियाणे लावण्यासाठी गुरुवारी दुपारी गेले असता त्यांना कपाशीची उगवण झालेली कोवळी रोपे जळाल्याचे दिसून आले. सदर शेताचे क्षेत्र एकूण तीन एकर असून, शेताच्या एका पांदीच्या बाजूला अंदाजे दोन एकर क्षेत्रावर अज्ञाताने तणनाशकाची फवारणी केल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. ईश्वर पाटील यांनी ही घटना गावातील पोलीस पाटील दत्तू पाटील यांना बोलावून त्यांच्यासमोर व्यथा मांडली. त्यानंतर ईश्वर पाटील पिंपळगाव हरेश्वर (पाचोरा) येथील पोलीस स्टेशनला जाऊन, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.

घटनेचा तपास बीट हवालदार राजेश खोंडे व त्यांचे सहकारी करीत असून, विकृती करणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

===Photopath===

170621\17jal_1_17062021_12.jpg

===Caption===

कपाशीवर अज्ञाताने कपाशी पिकावर तणनाशक फवारून नुकसान

Web Title: Damage caused by unknown spraying of herbicides on cotton crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.