सात तालुक्यांमध्ये साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:46 AM2021-02-20T04:46:31+5:302021-02-20T04:46:31+5:30

जळगाव : जिल्ह्यात गुरुवार, १८ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सात तालुक्यांमध्ये तीन हजार ५९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ...

Damage to crops on three and a half thousand hectares in seven talukas | सात तालुक्यांमध्ये साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सात तालुक्यांमध्ये साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Next

जळगाव : जिल्ह्यात गुरुवार, १८ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सात तालुक्यांमध्ये तीन हजार ५९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक गव्हाच्या पिकाला फटका बसला असून सर्वच ठिकाणी ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाले आहे.

गुरुवारी रात्री जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस व गारपिट झाली. यात रावेर, मुक्ताईनगर, भडगाव, चोपडा, एरंडोल, अमळनेर, पारोळा या तालुक्यांमध्ये १४१ गावांमध्ये १३ हजार ४१८ शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले.

सर्वाधिक गव्हाच्या पिकाला फटका

अवकाळी पाऊस व गारपिटीचा सर्वाधिक फटका गव्हाच्या पिकाला बसला आहे. तब्बल २००८ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले. त्या खालोखाल मक्याचे ७१६ हेक्टर, ज्वारीचे ४०२ हेक्टर, हरभऱ्याचे २८४ हेक्टर, इतर पिके ४६ हेक्टर, बाजरीचे ३१ हेक्टर, कांद्याचे २५ हेक्टर तर केळीचे एक हेक्टर असे एकूण तीन हजार ५९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

तालुकानिहाय झालेले नुकसान

तालुका झालेले नुकसान

रावेर ३२

मुक्ताईनगर ४७

भडगाव ६८

चोपडा १२६

एरंडोल ६५०

अमळनेर २५३०

पारोळा १४०

एकूण ३५९३

Web Title: Damage to crops on three and a half thousand hectares in seven talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.