चोपडा तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 04:29 PM2019-09-20T16:29:38+5:302019-09-20T16:31:15+5:30
सहा आठवड्यापासून धो-धो पाऊस होत आहे. त्यामुळे शेतात कायम पाणी साचल्याने कांद्याची रोपे, कापूस, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, मका या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादन हातातून गेले आहे.
चोपडा, जि.जळगाव : तालुक्यात सर्वत्र गेल्या सहा आठवड्यापासून धो-धो पाऊस होत आहे. त्यामुळे शेतात कायम पाणी साचल्याने कांद्याची रोपे, कापूस, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, मका या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादन हातातून गेले असल्याने शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
२० रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयात निमगव्हाण येथील शेतकºयांनी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे निमगव्हाण गावासह तालुक्यातील सर्वच प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनातर्फे मदत मिळावी यासाठी नायब तहसीलदार राजेश पौळ यांच्यासह तालुका कृषी अधिकाºयांना निवेदन आले.
या निवेदनावर गावातील १५० शेतकरी बांधवांच्या सह्या आहेत. निवेदन देतेवेळी दिलीप रुपसिंग पाटील, धनेश भाटिया, लोटन गबा पाटील, अनिल शिवाजी बाविस्कर, राजेंद्र चिंतामण पाटील, देवानंद पाटील, मंगल छन्नू पाटील, टेमलाल दौलत पाटील, शशिकांत बिºहाडे, वकील बाविस्कर, ढेकू पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.