दोन दिवसांत १२ तालुक्यात सात हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:14 AM2021-03-24T04:14:49+5:302021-03-24T04:14:49+5:30

जळगाव : सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे १२ तालुक्यांत सात हजार २०२०.८१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ...

Damage to more than seven thousand hectares in 12 talukas in two days | दोन दिवसांत १२ तालुक्यात सात हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान

दोन दिवसांत १२ तालुक्यात सात हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान

Next

जळगाव : सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे १२ तालुक्यांत सात हजार २०२०.८१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये शनिवार, २० मार्च रोजी सहा तालुक्यातील चार हजार ५३४.३० हेक्‍टर तर २१ रोजी सात तालुक्यातील दोन हजार ६६८.५१ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक एक हजार ९०६ हेक्‍टरवर जळगाव तालुक्यात नुकसान झाले आहे. पिकांमध्ये मक्‍याला सर्वाधिक फटका बसला असून, दोन दिवसांत दोन हजार ६०७.५६ हेक्‍टरवरील मका हातचा गेला आहे.

गेल्या महिन्यात १८ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमधून बळीराजा सावरत नाही, तोच पुन्हा २० व २१ मार्च रोजी संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामध्ये २० रोजी जिल्ह्यातील जळगाव, बोदवड, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या सहा तालुक्यांत पिकांना मोठा फटका बसला. त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा २१ रोजी यावल, रावेर, चाळीसगाव, जामनेर, चोपडा, अमळनेर, पारोळा या तालुक्यांना फटका बसला. याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

जळगाव, चाळीसगाव तालुक्यात अधिक नुकसान

शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामध्ये सर्वाधिक नुकसान जळगाव तालुक्यातील झाले असून, एक हजार ९०६ हेक्‍टरवरील पिके नष्ट झाली आहेत. त्या खालोखाल चाळीसगाव तालुक्यात १५९२.९० हेक्‍टरवर नुकसान झाले, तसेच पाचोरा तालुक्यात ८६२.२० हेक्‍टर, बोदवड तालुक्यात ८९.४० हेक्‍टर, मुक्ताईनगर तालुक्यात ४६ हेक्‍टर, भडगाव तालुक्यात ३७.८० हेक्टरवर असे एकूण चार हजार ५३४.३० हेक्‍टरवर नुकसान झाले आहे. २१ रोजी चाळीसगाव तालुक्यात पुन्हा अवकाळी पाऊस होऊन तेथे १२५.९० हेक्टर असे दोन दिवसांत एकूण १७१८.८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या सोबत २१ रोजी सर्वाधिक ८६७.५० हेक्टरवर पारोळा तालुक्यात ७५९.२५ हेक्टरवर जामनेर तालुक्यात, अमळनेर तालुक्यात ५९७.५० हेक्टर, रावेर तालुक्यात ३०३०.५६ हेक्टर, चोपडा तालुक्यात १३.५० हेक्टर व यावल तालुक्यात १.४० हेक्टर असे एकूण २६६८.५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान २१ रोजी नुकसान झाले.

सर्वाधिक फटका मक्याला

पिकांमध्ये सर्वाधिक फटका मक्‍याला बसला असून, २० रोजी सहा तालुक्यात १३९१.२० हेक्‍टरवरील मका नष्ट झाला आहे. २१ रोजी पुन्हा १२१६.३६ हेक्टर असे एकूण २६०७.५६ हेक्टरवरील मक्याचे दोन दिवसांत नुकसान झाले. या सोबतच २० रोजी रब्बी ज्वारीचे १०५४.५० हेक्‍टरवर नुकसान झाले आहे. ६११.२० हेक्‍टर वरील गहू, ५१८.३० हेक्‍टरवरील फळपिके, २५५.४० हेक्‍टरवरील भाजीपाला, २३५ हेक्‍टर वरील केळी, २०९ हेक्‍टरवरील बाजरी, २०२.३० हेक्‍टरवरील हरभरा, ५०.९० हेक्‍टरवरील कांदा, ४.१० हेक्‍टरवरील तीळ, २.४० हेक्‍टरवरील मूग असा विविध पिकांना फटका बसला आहे. २१ रोजी पुन्हा ४६९.५५ हेक्टरवरील ज्वारी, २५१.४० हेक्टरवरील गहू, २१३.३० हेक्टरवरील बाजरी, ५४.५० हेक्टरवरील हरभरा, ६७.८० हेक्टरवरील कांदा, ३.५० हेक्टरवरील तीळ, ०.१० हेक्टरवरील सूर्यफूल, १७ हेक्टरवरील शेवगा, ३९.६० हेक्टरवरील भाजीपाला, २१४.३० हेक्टरवरील केळी, सहा हेक्टरवरील पपई, १०२.६० हेक्टरवरील फळपिके, १२.५० हेक्टरवरील लिंबू असे एकूण २६६८.५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

३२५ गावांतील १० हजार ५७७ शेतकऱ्यांचे नुकसान

२० व २१ मार्च रोजी १२ तालुक्यात ३२५ गावातील १० हजार ५७७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २० रोजी सहा तालुक्यांमधील ११२ गावांतील एकूण सहा हजार ६८९ शेतकऱ्यांचे तर २१ रोजी २१३ गावातील तीन हजार ८८८ शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान ३३ टक्क्यांच्या वर असून, तसा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.

Web Title: Damage to more than seven thousand hectares in 12 talukas in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.