सहा तालुक्यात साडेचार हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:17 AM2021-03-23T04:17:47+5:302021-03-23T04:17:47+5:30

जळगाव : शनिवार, २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील चार हजार ५३४.३० हेक्‍टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान ...

Damage over an area of more than four and a half thousand hectares in six talukas | सहा तालुक्यात साडेचार हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान

सहा तालुक्यात साडेचार हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान

Next

जळगाव : शनिवार, २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील चार हजार ५३४.३० हेक्‍टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक एक हजार ९०६ हेक्‍टरवर जळगाव तालुक्यात नुकसान झाले आहे. पिकांमध्ये मक्‍याला सर्वाधिक फटका बसला असून १३९१.२० हेक्‍टरवरील मका हातचा गेला आहे.

गेल्या महिन्यात १८ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी मधून बळीराजा सावरत नाही तोच पुन्हा २० मार्च रोजी संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामध्ये जिल्ह्यातील जळगाव, बोदवड, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या सहा तालुक्यात पिकांना मोठा फटका बसला आहे. याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला आहे.

जळगाव, चाळीसगाव तालुक्यात अधिक नुकसान

शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामध्ये सर्वाधिक नुकसान जळगाव तालुक्यातील झाले असून एक हजार ९०६ हेक्‍टर वरील पिके नष्ट झाली आहे. त्याखालोखाल चाळीसगाव तालुक्यात १५९२.९० हेक्‍टर वर नुकसान झाले. तसेच पाचोरा तालुक्यात ८६२.२० हेक्‍टर, बोदवड तालुक्यात ८९.४० हेक्‍टर, मुक्ताईनगर तालुक्यात ४६ हेक्‍टर, भडगाव तालुक्यात ३७.८० हेक्टरवर असे एकूण चार हजार ५३४.३० हेक्‍टरवर नुकसान झाले आहे.

सर्वाधिक फटका मक्याला

पिकांमध्ये सर्वाधिक फटका मक्‍याला बसला असून सहा तालुक्यात १३९१.२०हेक्‍टरवरील मका नष्ट झाला आहे. त्याखालोखाल रब्बी ज्वारीचे १०५४.५० हेक्‍टरवर नुकसान झाले आहे. ६११.२० हेक्‍टर वरील गहू, ५१८.३० हेक्‍टर वरील फळपिके, २५५.४० हेक्‍टरवरील भाजीपाला, २३५ हेक्‍टर वरील केळी, २०९ हेक्‍टरवरील बाजरी, २०२.३० हेक्‍टरवरील हरभरा , ५०.९० हेक्‍टरवरील कांदा, ४.१० हेक्‍टरवरील तीळ, २.४० हेक्‍टरवरील मूग असा विविध पिकांना फटका बसला आहे.

११२ गावातील सहा हजार ६८९ शेतकरी बाधित

सहा तालुक्यांमधील ११२ गावातील एकूण सहा हजार ६८९ शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान ३३ टक्क्यांच्या वर असून तसा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.

Web Title: Damage over an area of more than four and a half thousand hectares in six talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.