लोकमत बालविकास मंचच्या शिबिरातून गिरविले नृत्याचे धडे - शिवम वानखेडे

By admin | Published: April 23, 2017 03:54 PM2017-04-23T15:54:28+5:302017-04-23T15:54:28+5:30

तिस:या इयत्तेत असताना लोकमत बालविकास मंचतर्फे आयोजित नृत्य शिबिरात नृत्याचे धडे घेतले.

Dance of the dance drama - Shivam Wankhede | लोकमत बालविकास मंचच्या शिबिरातून गिरविले नृत्याचे धडे - शिवम वानखेडे

लोकमत बालविकास मंचच्या शिबिरातून गिरविले नृत्याचे धडे - शिवम वानखेडे

Next

नृत्य स्पर्धेतील विजयानंतर  ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

ऑनलाइन लोकमत


जळगाव, दि. 23 - दूरचित्र वाहिनीवरील नृत्य स्पर्धेत विजयी झालो असलो तरी, इथर्पयत पोहचण्यासाठी अनेकांचा मोलाचा वाटा आहे.  तिस:या इयत्तेत असताना लोकमत बालविकास मंचतर्फे आयोजित नृत्य शिबिरात नृत्याचे धडे घेतले. त्यावेळेपासूनच नृत्याची आवड निर्माण झाल्याचे नृत्य स्पर्धेतील विजेता शिवम वानखेडे याने सांगितले.
 शिवम वानखेडे याने आई सुवर्णा वानखेडे, वडील शिरीष वानखेडे व नृत्यशिक्षक अखिल तिलकपुरे यांच्यासह ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकमत बालविकास मंचतर्फे आयोजित समर कॅम्पमध्ये                  सहभागी झालेल्या विद्याथ्र्यानी ‘लोकमत’च्यावतीने शिवमचे स्वागत केले. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी हे उपस्थित होते. यावेळी शिवमने नृत्य स्पर्धेतील आपला प्रवास सांगितला.
शिवम म्हणाला, लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. नृत्याच्या विविध स्पर्धामध्ये भाग घ्यावा, नृत्याचे प्रशिक्षण घ्यावे यासाठी आईने नेहमी पाठिंबा दिला. वडील सुरुवातीला नाही म्हणायचे मात्र, माझा उत्साह व कामगिरी पाहून त्यांनीही  पाठिंबा दिला. इयत्ता तिसरीमध्ये असताना ‘लोकमत’ बालविकास मंचकडून गोलाणी मार्केट मध्ये नृत्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणीदेखील मला आईनेच दाखल केले व त्याच ठिकाणापासून माङया नृत्याला सुरुवात झाली.
‘डीआयडी’ पासून नवी ओळख
शिवमने म्हणाला, सातवीत असताना घराजवळच नृत्याचा क्लास सुरू झाल्याने आईने अखिल तिलकपुरे यांच्याकडे नृत्याचा क्लास लावून दिला. त्यानंतर जळगावमध्येच आयोजित काही नृत्य स्पर्धामध्ये यश मिळविल्यानंतर  तिलकपुरे यांनी ‘डीआयडी लीटल चॅम्प’ स्पर्धेसाठी ऑडिशन द्यायला सांगितली. त्या स्पर्धेत पहिल्या 14 मध्ये राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळविले. तसेच ‘2 मॅड’ स्पर्धेसाठी व्हिडीओ पाठविले. त्यानंतर औरंगाबाद येथे 8 मुलांमधून 6 मुलांची निवड करण्यात आली.
शिवम अभ्यासातही पुढेच
नृत्य स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर स्पर्धेत यश मिळविण्यासाठी 12-12 तास मेहनत घेतली. अशा स्पर्धामध्ये यश मिळवायचे असेल तर जिद्द, चिकाटीशिवाय पर्याय नसल्याचेही शिवम म्हणाला. तसेच नृत्य कलेसह शिवम अभ्यासातही पुढेच असून 10 वीत 88 टक्के तर 12 वीत 74 टक्के गुण मिळविले होते. तसेच शिवम सध्या पुणे येथील एस.पी. महाविद्यालयात बी.एसस्सी.च्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.
‘लोकमत’ बाल विकास मंचच्या मुलांमध्ये रमला शिवम
लोकमत शहर कार्यालयाला शिवमने भेट दिली असता, कार्यालयात ‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे समर कॅम्प सुरूहोता. शिवमने तेथे भेट दिली असता त्याच्या भोवती मुलांनी गराडा घातला.  शिवमचे स्वागतदेखील ‘लोकमत’तर्फे मुलांच्याच हस्ते करण्यात आले. त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली.  मुलांच्या मागणीला दाद देऊन त्याने त्यांच्यासोबत फोटो काढले.
तनय व शिवमचा जळगावकरांना अभिमान
शिवमचे नृत्यशिक्षक अखिल तिलकपुरे म्हणाले की, डान्स इंडिया डान्स या स्पर्धेत तनय मल्हारा विजेता ठरला. त्यापाठोपाठ शिवमने यश मिळविले.   आता जळगाव सारख्या लहान शहरातदेखील नृत्याचे धडे घेऊन मोठय़ा स्पर्धेत विजयी होता येते हे तनय व शिवमने सिध्द करून दाखविले आहे. जळगावचे नाव देशाच्या नकाशावर झळकविले.

Web Title: Dance of the dance drama - Shivam Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.