जळगावात नृत्यातून विद्याथ्र्यानी घडविले देशभक्तीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:54 PM2018-01-24T13:54:52+5:302018-01-24T13:57:40+5:30
27 शाळांचा सहभाग
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24- ‘तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा, कदम कदम बढाते जा, जय हो, सत्यमेव जयते, वंदे मातरम, संदेसे आते है, सुनो गौर से दुनिया वालो बुरी नजर ना हमपे डालो..’ यासह विविध देशभक्तीपर गीतांवर सादर नृत्याविष्कारातून विद्याथ्र्यांनी देशभक्ती जागवत सामाजिक संदेश दिले. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेत शहरातील 27 शाळांनी सहभाग नोंदविला.
सुभाष चौक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 121 व्या जयंती निमित्त समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा विरोधी पक्षनेते सुनील माळी, संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत खटोड उपस्थित होते.
क्रांतीकारकांच्या जीवनकार्याला उजाळा
विद्याथ्र्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणा:या क्रांतीकारकांच्या जीवनकार्याला उजाळा दिला. याप्रसंगी नितीन चांडक, संजय गांधी, विजय जगताप, भरतकुमार शहा आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन प. न. लुंकड विद्यालयातील विद्याथ्र्यांनी केले. सुभाष चौक बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.समूह नृत्य स्पर्धेत शहरातील अनेक शाळांतील विद्याथ्र्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
वेशभूषेने वेधले लक्ष
स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्याथ्र्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, शहिद भगतसिंग, राजगुरु, सुकदेव यांच्यासह विविध राज्यांतील वेशभुषा करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेतील विजेत्या शाळा
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक अभिनव माध्यमिक विद्यालयाने मिळविला तर नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय द्वितीय तर अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलने तृतीय क्रमांक मिळविला. डॉ. अविनाश आचार्य विद्यामंदिर, ज. सु. खडके विद्यालय, विद्या विकास मंदिर, सिद्धीविनायक विद्यालय, श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, जय दुर्गा माध्यमिक विद्यामंदिर या शाळांच्या विद्याथ्र्याना उत्तेजनार्थ परितोषिकाचे मानकरी ठरले.