पाडळसरे धरणाच्या जनआंदोलन बैठकीला अनेकांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:59 AM2019-03-11T00:59:03+5:302019-03-11T00:59:27+5:30
आजी-माजी लोकप्रतिनिधींंच्या बैठकीला ६ तालुक्यातील अनेकांनी दांडी
अमळनेर : पाडळसे धरण जनआंदोलन समितीतर्फे रविवारी झालेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींंच्या बैठकीला ६ तालुक्यातील अनेकांनी दांडी मारली.
धरणास निधी न देणाऱ्या शासनाच्या विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतसारा व वीजबील भरू नये, महामोर्चा काढावा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना जाब विचारावा असा सूर यावेळी उमटला.
आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार प्रा.शरद पाटील आदींनी आंदोलक म्हणून या बैठकीला उपस्थिती दिली. जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी यांनी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मार्गदर्शन करण्यासाठी व शासन दरबारी पुढाकार घेण्यासाठी आवाहन केले. प्रा.शिवाजीराव पाटील यांनी समितीचे पत्र वाचून दाखविले तर धरणाची आजची तांत्रिक माहिती दिली. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार प्रा.शरद पाटील, साहेबराव पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी नामदेव पाटील, हिरामण कंखरे, अजयसिंग पाटील, योगेश पाटील, प्रा.सुनील पाटील, रणजित शिंदे, चंद्रकांत साळी, प्रशांत भदाणे, हिरालाल पाटील, एस.एम.पाटील, डी.एम.पाटील, सुनील पवार, महेश पाटील, आर.बी.पाटील देविदास देसले, निंबा पाटील, रामराव पाटील, पुरुषोत्तम शेटे, वसुंधरा लांडगे, सुपडू बैसाने, सुनील भामरे, शिवाजी पाटील, गोविंदा पाटील, मगन शिंगाने, शालिग्राम पाटील, कुंदन खैरनार, सुहास एलमामे, परमेश्वर पाटील, रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.
गैरहजर आजी माजी आमदार, खासदारांबद्दल यावेळी तीव्र संताप करण्यात आला.