जळगाव येथील कृउबातील व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी दाणाबाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:57 AM2019-06-20T11:57:24+5:302019-06-20T11:57:51+5:30
बाजार समितीमधील दुकानांवर लावले काळे झेंडे
जळगाव : परवानगी नसताना व्यापारी संकुलासाठी पाडण्यात आलेल्या कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या भिंतीचे काम अद्यापही सुरू झालेले नसल्याने व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद बुधवारी तिसºया दिवशीही सुरू होता. व्यापाºयांच्या या बंदच्या समर्थनार्थ दाणाबाजार असोसिएशननेदेखील पाठिंबा दिला असून शुक्रवार, २१ जून रोजी दाणाबाजार बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
व्यापारी संकुल बांधण्यासाठी ८ जून रोजी कृषी बाजार समितीची संरक्षण भिंत पाडण्यात आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी संतप्त झाले व व्यापाºयांनी बंद पुकारला. त्यानंतर भिंत बांधण्याचे आश्वासन देण्यात आल्याने हा बंद मागे घेण्यात आला होता. मात्र बाजार समितीने आश्वासन न पाळल्यामुळे पुन्हा हा वाद उफाळून आला. पाडलेले बांधकाम पुन्हा बांधण्याचे विकासकांना आदेश दिल्यानंतर आठवडा उलटूहनही भिंत बांधण्यासंदर्भात कार्यवाही होत नसल्याने मार्केट यार्ड आडत असोसिएशनने सोमवारपासून पुन्हा बंद पुकारून आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. त्यामुळे दररोज व्यापाºयांचे मोठे नुकसान होत असले तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप व्यापाºयांनी केला आहे. परिणामी हे आंदोलन अधिक तीव्र केले जात आहे. यात मंगळवारी बाजार समितीत निषेध आंदोलन करण्यात आले तसेच युवा व्यापाºयांनी बाजार समिती परिसरात मोटारसायकल रॅली काढली़
त्यानंतर बुधवारीदेखील हे आंदोलन कायम होते. यात सर्व व्यापाºयांनी दुकानांवर काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केला. तसेच जो पर्यंत भिंतीचे काम सुरू होत नाही, तो पर्यंत बंद ठेवून रोज आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती व्यापाºयांकडून मिळाली़
दाणाबाजार असोसिएशनचा पाठिंबा
मार्केट यार्ड आडत असोसिएशनच्यावतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला पाठिंबा देण्यासंदर्भात बुधवारी दाणाबाजार असोसिएशनची बैठक झाली. यामध्ये बाजार समितीमधील व्यापाºयांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने या आंदोलनास पाठिंबा देण्याचे ठरविण्यात आले व तसे पत्र मार्केट यार्ड आडत असोसिएशनला देण्यात आले. त्यानुसार शुक्रवार, २१ रोजी दाणाबाजारातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे.
या बैठकीस दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया, सचिव मुकेश लोटवाला, उपाध्यक्ष अशोक धूत, अश्वीन सुरतवाला, सहसचिव संजय रेदासनी, कार्याध्यक्ष सतीश जगवाणी, खजिनदार लक्ष्मीकांत वाणी, शंकर पोपली, अरविंद मणियार, संजय शहा, अशोक राठी आदी उपस्थित होते.
... तर जळगाव बंद ठेवणार
बाजार समितीमधील व्यापाºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यापाºयांनी केला आहे. त्यानुसार शुक्रवारी दाणाबाजार असोसिएशनच्या बंद पाठोपाठ जळगाव शहरही बंद ठेवण्यात येईल, या विषयी विचार सुरू असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.