भादली खदान रस्तालगत साईडपट्ट्या खचल्याने धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:35 AM2020-06-08T10:35:37+5:302020-06-08T10:36:09+5:30

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा ते शेळगाव प्राथमिक जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्यालगत साईडपट्या खचल्याने ...

Danger of erosion of sidewalks along Bhadali mine road | भादली खदान रस्तालगत साईडपट्ट्या खचल्याने धोका

भादली खदान रस्तालगत साईडपट्ट्या खचल्याने धोका

googlenewsNext

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा ते शेळगाव प्राथमिक जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्यालगत साईडपट्या खचल्याने धोका वाढत चालला आहे.
खारी डोब व भादली जवळ खदान हे मोठे खड्डे जवळून रस्ता जात असल्याने पावसामुळे रस्ताच्या नवीन साईट पट्या खचल्याने येणाऱ्या जाणाºया वाहनांना अपघात घडण्याची शक्यता आहे.
येथे रस्ताच्या कडेला संरक्षण भिंत बांधण्यात यावी भिंती मुळे होणारा पुढील अनर्थ टळण्यास मदत होईल, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, आसोद्याजवळ असलेली खारी डोबचा मोठा खड्डा आहे, येथे पावसाळ्यात खूप पाणी साचत असते. सध्या खारी डोब जवळून जाणारा आसोदा रस्त्याचे डांबरीकरण सुरु आहे. पुढे येथेही रस्ता पावसाळ्यात खचण्याची भीती नाकारता येत नाही. त्वरित दखल घेऊन खारी डोब वर रास्त नजीक संरक्षण भिंत बांधण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष त्वरित पाहणी करून मोठी रस्तालगत संरक्षण भिंत उभारणी करावी अशी मागणी अ‍ॅड.राधिका ढाके, आसोद्याचे प्रगतिशील शेतकरी किशोर चौधरी, संजीव पाटील यांनी केली आहे.
या ठिकाणी काही अपघात झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे.

-याबाबत माहिती अशी की हायब्रिड अँन्युइटी प्रोग्राम अंतर्गत आसोदा ते शेळगाव प्राथमिक जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सुरु आहे. भादली शिवारातील रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची रस्त्यासाठी दगड खडी साठी मोठी खदान (खड्डा) आहे.
- यामध्ये पावसाचे पाणी साचत असते पावसाच्या पाण्यामुळे नुकताच तयार झालेल्या रस्त्याच्या साईट पट्या खचल्या आहेत पाण्याची पाईप लाईन उघडी पडली आहे. वाहन धारकांनी भादली पोलीस पाटील अ‍ॅड. राधिका ढाके व सामाजिक कार्यकर्ते गोपाळ ढाके, शिवसेनेचे छगन खडसे यांना माहिती दिली. त्यांनी खदान जवळ जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली बांधकाम विभागाने वेळीच दखल घेऊन संरक्षन भिंत बांधण्यात यावी.

Web Title: Danger of erosion of sidewalks along Bhadali mine road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.