मेहरूण तलावाची जैवविविधता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:29 PM2019-06-02T12:29:36+5:302019-06-02T12:30:00+5:30

१२ व्या शतकापासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मेहरूण तलावातील जैवविविधतादेखील मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आली आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्हा आणि गाव ...

The danger of the Mayrun lake's biodiversity | मेहरूण तलावाची जैवविविधता धोक्यात

मेहरूण तलावाची जैवविविधता धोक्यात

Next

१२ व्या शतकापासूनची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मेहरूण तलावातील जैवविविधतादेखील मानवी अतिक्रमणामुळे धोक्यात आली आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे जिल्हा आणि गाव पातळीवर जैवविविधता समित्या स्थापन करून त्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. मात्र, यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था तसेच प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे तलाव परिसरातील जैवविविधता धोक्यात आली आहे. विविध वनस्पती, जलचर प्राणी, मासे, देशी- परदेशी पक्षी, वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी यांचे अस्तित्व असलेल्या मेहरूण परिसरात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. लांडोरखोरी राखीव वनक्षेत्र लागून असल्याने वन्यप्राण्यांचेदेखील या भागात वास्तव्य असते. मात्र, मानवी अतिक्रमण, प्रदूषण, सांडपाणी, रहिवासासाठी उभारलेले सिमेंटचे जंगल यामुळे या परिसरातील नैर्सगिक सौद्यर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़ शहरातील दोनशेवर विहिरींना जीवदान देणाऱ्या मेहरूण तलावातील नितळ पाणी इतिहास जमा झालेले आहे. जळगावच्या वैभवात भर घालणाºया या तलावात ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे. गटारीच्या पाण्यामुळे अनेक वनस्पती नष्ट होत असून, ५० टक्के पक्ष्यांनी या तलावाकडे पाठ फिरवली आहे. नैसर्गिक जलस्रोतही बदलल्याने या तलावाची वाटचाल गटाराच्या दिशेने सुरू झाली आहे. म्हणून सर्व पर्यावरण प्रेमी व जागरूक नागरिकांनी शहराच्या सौंदर्यात भर घालणाºया मेहरुण तलावाचे संरक्षण व जलसंवर्धन करणे तसेच मनपाने त्याची योग्य निगा व काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
- अशफाक पिंजारी, जिल्हाध्यक्ष आॅल इंडिया मुस्लीम ओबीसी आॅर्गनायझेशन

Web Title: The danger of the Mayrun lake's biodiversity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव