शीतपेटी अभावी जिल्हा रुग्णालय परिसरात दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:19 PM2018-06-02T13:19:32+5:302018-06-02T13:19:32+5:30
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २ - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेनगृहातील शीतपेटी गेल्या चार महिन्यांपासून बंद असून त्याची दुरुस्ती होत नसल्याने शवविच्छेदनासाठी आलेले मृतदेह उघड्यावर ठेवावे लागत आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीशी संपर्क साधला असता दुरुस्तीसाठी नकार मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा रुग्णालयामधील शवविच्छेनगृहातील दोन शीतपेटी गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अनोळखी मृतदेह ठेवण्यासाठी यंत्रणाच नसल्याने ते मृतदेह तीन दिवस उघड्यावर ठेवावे लागत आहे. मृतदेह उघट्यावर ठेवले जात असल्याने शवविच्छेनगृहात प्रचंड उग्रवास पसरलेला आहे. यामुळे या परिसरात कर्मचारीदेखील फिरकत नसल्याचे चित्र आहे. कर्मचारी या उग्रवासामुळे हैराण झाले आहेत तसेच शवविच्छेनासाठी आणलेला मृतदेह उघड्यावर ठेवावे लागत असल्याने मृतदेहाची अवहेलना होत आहे.