दापोरी बु. येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 10:38 PM2021-06-17T22:38:29+5:302021-06-17T22:39:48+5:30

दापोरी बु. येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गुरुवारी पहाटे ३ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.

Dapori Bu. Debt-ridden farmer commits suicide here | दापोरी बु. येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

दापोरी बु. येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देसव्वा दोन लाखांचे कर्ज असल्याची माहिती.

लोकमत न्यूज नेटवर्क

पातोंडा, ता. अमळनेर : येथून जवळच असलेल्या दापोरी बु. येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गुरुवारी पहाटे ३ वाजता घराच्या छताच्या  गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव पंढरीनाथ काशीनाथ पाटील (५३) असे आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी पंढरीनाथ पाटील यांच्याकडे ८ ते १० बिघे शेतजमीन आहे. त्यांच्याकडे विकास सोसायटीचे सव्वा दोन लाख पीक कर्ज असून ते थकलेले आहे. तसेच त्यांनी बाहेरील पैशांची हात उचल केली असल्याचे समजते.

गेल्या तीन-चार वर्षांपासून बोंडअळी, बेमोसमी पाऊस, दरवर्षी येणाऱ्या उत्पादनात घट अशा नापिकीमुळे ते बिकट आर्थिक संकटात होते. शेतीला लागणारा खर्च, घरखर्च आदी सांसारिक आर्थिक प्रपंच कसा भागवावा, या कारणाने ते नैराश्येचे जीवन जगत होते. या कारणामुळे त्यांनी कंटाळून आत्महत्या केली, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, एक भाऊ, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते माजी ग्रामपंचायत सदस्य साहेबराव काशीनाथ पाटील यांचे लहान भाऊ होत.

Web Title: Dapori Bu. Debt-ridden farmer commits suicide here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.