एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजाला दिशा देणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 05:34 PM2018-09-14T17:34:07+5:302018-09-14T17:35:02+5:30

भुसावळ येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

A daring surrender venture gives direction to society | एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजाला दिशा देणारा

एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजाला दिशा देणारा

Next
ठळक मुद्दे१२५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपगरज ओळखून अंतर्नादने राबविले उपक्रम

भुसावळ, जि.जळगाव : सण, उत्सवात विद्यार्थी केंद्रीत उपक्रम राबवणाऱ्या सेवाव्रतींना समाजाने खंबीर पाठबळ द्यावे. गरज ओळखून सेवाप्रकल्प निर्व्याज भावनेतून हाती घेणाºयांचे प्रमाण वाढायला हवे. अंतर्नाद प्रतिष्ठान राबवत असलेला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजाला दिशा देणारा आहे, असे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे समन्वयक अरुण मांडाळकर यांनी सांगितले.
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवात ‘एक दुर्वा समर्पणाची’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी येथील स्वातंत्र्यसैनिक कृ.पा.पाटील प्राथमिक विद्यामंदिरात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. वाचन ही जीवन समृद्ध करणारी कला आहे. ती विद्यार्थी दशेत आत्मसात करणे सुलभ होते. अंतर्नादने गरज ओळखून जो उपक्रम राबवला आहे, तो पथदर्शी आहे, असे मांडाळकर यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे म्हणून शहिद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश रायपुरे, नर्मदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परीक्षित बºहाटे, सचिव एस. डी.बºहाटे, सदस्य यशवंत भंगाळे, प्रा.डॉ.भाग्यश्री भंगाळे, सिद्धी विनायक फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, सामाजिक कार्यकर्ते राजू महाजन, मनसेच्या महिला आघाडी शहराध्यक्षा रिना साळवी, शहराध्यक्ष विनोद पाठक, मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी यांची उपस्थिती होती. अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रकल्पप्रमुख प्रदीप सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ममता फालक यांनी, तर आभार समन्वयक अमितकुमार पाटील यांनी मानले.
शिक्षिका मीनाक्षी चौधरी, सुनीता बºहाटे यांच्यासह ज्ञानेश्वर घुले, संजीव भटकर, प्रभाकर नेहेते, शैलेंद्र महाजन, महेश पाटील, सचिन पाटील, भूषण झोपे, संदीप सपकाळे, मंगेश भावे, नितीन देशमुख यांचे सहकार्य लाभले. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या १२५ विद्यार्थ्यांना वह्या, पेपर लिहिण्याचे पॅड, वह्यांचे कव्हर, पेन, पेन्सील, खोडरबर असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.


 

Web Title: A daring surrender venture gives direction to society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.