‘मराठी लोकरंगभूमी’तून लोकपरंपरेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:13+5:302021-01-09T04:13:13+5:30

जळगाव : लोकरंगभूमीच्या आधुनिक परंपरेत तमाशा व लोकनाट्याचा परिचय होणार आहे. आदीम परंपरा लोकरंगभूमीतून दिसून येते. सण-उत्सवात विधिनाट्य दिसतात. ...

Darshan of folk tradition from ‘Marathi Lokrangbhoomi’ | ‘मराठी लोकरंगभूमी’तून लोकपरंपरेचे दर्शन

‘मराठी लोकरंगभूमी’तून लोकपरंपरेचे दर्शन

Next

जळगाव : लोकरंगभूमीच्या आधुनिक परंपरेत तमाशा व लोकनाट्याचा परिचय होणार आहे. आदीम परंपरा लोकरंगभूमीतून दिसून येते. सण-उत्सवात विधिनाट्य दिसतात. एखादी भावना विधिनाट्यातून दिसून येते. श्रोता व सादरकर्ता वेगळा नाही. लोकरंगभूमीतून एकाच रूपाने तो समोर येतो, असे प्रतिपादन हभप प्रा. सी. एस. पाटील यांनी येथे केले.

येथील लेवा एज्युकेशनल युनियन संचलित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे शुक्रवारी दुपारी कॉन्फरन्स हॉलमध्ये साहित्यिक तथा प्राचार्य डॉ. किसन पाटील यांच्या ‘मराठी लोकरंगभूमी’ या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे अध्यक्षस्थानी होत्या.

‘मराठी लोकरंगभूमी’चे लेखक प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. गेल्या पस्तीस वर्षांचे अध्ययन आणि अध्यापनाच्या चिंतनामधून निर्माण झालेल्याचे फलित या ग्रंथातून मांडले आहे. लोकसाहित्याचा अभ्यास ‘लोकतत्त्व आणि इहवादी’ दृष्टीने कसा करावा, तसेच अभिजन परंपरा आणि लोकायत परंपरा यातील साम्यभेदासह वेगळेपणा कसा महत्त्वाचा ठरतो, अशा भूमिकाही या ग्रंथातून मांडल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. डॉ. प्रकाश सपकाळे यांनी ग्रंथ परिचयाचे भाषण केले. प्राचार्या डॉ. गौरी राणे यांनीही मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी कुमुद पब्लिकेशनच्या संचालिका संगीता माळी, ज्येष्ठ समीक्षक प्रा. प्रकाश सपकाळे, उपक्रमशील शिक्षक विजय लुल्हे, प्रा. योगेश महाले, प्रा. गोपीचंद धनगर, प्रा. विनायक पाटील, उपप्राचार्य प्रा. पी. एन. तायडे, उपप्राचार्य प्रा. सतीश जाधव, पुरुषोत्तम पारधे, रा. ना. कापुरे, प्रा. मयूर पाटील, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले, गिरीश चौगावकर, सुनील महाजन, शरद महाजन आदी उपस्थित होते.

या ग्रंथाची निर्मिती अथर्व पब्लिकेशन्सतर्फे करण्यात आली असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक युवराज माळी, डॉ. सत्यजित साळवे, प्रा. दीपक पवार, प्रा. विनोद भालेराव, प्रा. वंदना नेमाडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रा. सत्यजित साळवे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दीपक पवार यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Web Title: Darshan of folk tradition from ‘Marathi Lokrangbhoomi’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.