रांगोळीतून भारतीय संस्कृतीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:16 AM2021-01-22T04:16:09+5:302021-01-22T04:16:09+5:30

जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी बेंडाळे महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा घेण्यात ...

Darshan of Indian culture through Rangoli | रांगोळीतून भारतीय संस्कृतीचे दर्शन

रांगोळीतून भारतीय संस्कृतीचे दर्शन

Next

जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी बेंडाळे महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यर्थिनींनी काढलेल्या रांगोळीतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडून आले. या स्पर्धेचे उद्घाटन उपप्राचार्य व्ही.जे. पाटील व महानगरमंत्री आदेश पाटील, राष्ट्रीय कला मंच प्रमुख भूमिका कानडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर भूमिका कानडे हिने प्रास्ताविक केले. महानगरमंत्री आदेश पाटील यांनी अभाविपमार्फत घेण्यात आलेल्या मिशन साहसी कार्यक्रमाची माहिती दिली. त्यानंतर रांगोळी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थिनींनी विविध विषयांवर आकर्षक रांगोळी काढल्या. सूत्रसंचालन हेमांगी पाटील हिने केले, तर स्पर्धेसाठी कुमुद नारखेडे यांनी परीक्षण केले. यावेळी हेमानी वाडीकर, हेमांगी पाटील, प्रज्ञा करंजे, रितेश महाजन, पवन भोई, चिराग तायडे, नितेश चौधरी, जितेश चौधरी, ऋतिक माहूरकर, प्रसाद पाटील, विजय वानखेडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Darshan of Indian culture through Rangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.