मंदिरांमध्ये दत्त पारायणाला आज पासून सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:15 AM2020-12-24T04:15:27+5:302020-12-24T04:15:27+5:30
बस स्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरात दत्त जयंती निमित्त सकाळी ८ ते १० या वेेळेत पारायण होणार असून, रात्री ...
बस स्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरात दत्त जयंती निमित्त सकाळी ८ ते १० या वेेळेत पारायण होणार असून, रात्री ८ ते ९ यावेळेत हभप दादा महाराज जोशी यांचे गुरुचरित्रावर प्रवचन होणार आहे. आठवडाभर हे पारायण चालणार असून, २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दादा महाराजांचे कीर्तन होऊन सायंकाळी ६ वाजता दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच जुन्या जळगावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिरात आजपासून दत्त पारायणाला सुरूवात होणार असल्याचे हभप श्रीराम महाराज जोशी यांनी सांगितले.
स्वामी समर्थ केंद्रात अखंड नामजप
प्रतापनगरातील स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम यज्ञ सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. शहरासह जिल्हाभरातील केंद्रामध्ये ५ ते ७ हजार सेवेकरी पारायणाला बसणार आहेत. या पारायणात श्रीगुरुचरित्र, श्री नवनाथ, श्रीपाद वल्लभ चरित्र व भगवत ग्रंथाचे वाचन होणार आहे. कोरोनाचे निमुर्लन होण्यासाठी संकल्प करण्यात येणार आहे. २९ रोजी दत्त जयंतीनिमित्त दुपारी १२. ३९ मिनिटांनी श्री गुरूचरित्र पोथीतील चौथ्या अध्यायाचे वाचन व नैवेद्य आरती होणार आहे. ३० रोजी सकाळी १०. ३० वाजता सत्यनारायणाच्या पुजनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी मास्क व सोशल डिस्टनिंगचे पालन करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
दत्त जयंतीनिमित्त अनेक भाविक घरगुती व मंदिरांमध्ये पारायण करित असल्यामुळे, त्यानुसार श्री दत्त चरित्र, गुरूचरित्र आदी ग्रंथाना मोठी मागणी वाढली आहे.