यात्रोत्सवाच्या दिवशी मुक्ताई परिसर सुने सुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:22 PM2021-03-09T16:22:11+5:302021-03-09T16:24:13+5:30

मुक्ताई यात्रोत्सव कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द झाला आहे.

On the day of the pilgrimage, the Muktai area was covered with gold | यात्रोत्सवाच्या दिवशी मुक्ताई परिसर सुने सुने

यात्रोत्सवाच्या दिवशी मुक्ताई परिसर सुने सुने

Next
ठळक मुद्देकोरोना पार्श्वभूमीवर यात्रा रद्द, गर्दी होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर : दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा मुक्ताई यात्रोत्सव कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द झाला आहे. दरवर्षी माघ कृ एकादशीला संत मुक्ताई मंदिर परिसरात लाखो भाविकांचा भक्तीचा मळा येथे फुलतो. यंदा मात्र यात्रोत्सव रद्द झाल्याने मंदिर परिसर सुनेसुने होते. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने सोमवार रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्त लावला होता.

महाराष्ट्रातील प्रमुख वारकरी संतपीठ असलेले संत मुक्ताबाई समाधीस्थळावर श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे सोमवार सुरू होणारा संत मुक्ताबाई-चांगदेव माघवारी महाशिवरात्र यात्रोत्सव सुरू होणार होता. दरवर्षी माघ कृ. विजया एकादशी या यात्रोत्सवचा महत्वपूर्ण दिवस असतो. यंदा मंगळवारी ९ मार्च रोजी विजया एकादशी होती. त्या अनुषंगाने येथे होणारी भाविक वारकऱ्यांच्या गर्दी लक्षात घेता प्रशासनाने आठवड्यापूर्वीच कोरोना संसर्जन्य आजाराच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पर्शवभूमीवर हा यात्रोत्सव सोहळा रद्द करण्याचा सूचना मंदिर प्रशासनाला दिल्या होत्या. त्यामुळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.

तीन दिवस भाविकांना दर्शन नाही

संत मुक्ताबाई मंदिर व्यवस्थापनाला जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या सुचनेनुसार ९ ते ११ मार्च तीन दिवस मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे मानाच्या दिंड्याना आधी दिलेली परवानगीदेखील प्रशासनाने रद्द केली होती. मोठ्या प्रयत्नाअंती मनाच्या पाच दिंड्याना मंदिरात जाण्याची परवानगी मिळाली. यात वारकरी फडकरी कीर्तन महासंघ, गोमाजी महाराज संस्थान नागझिरी, या सह अन्य तीन मनाच्या दिंड्यानी मुक्ताई दरबारात हजेरी लावली होती तर मुक्ताई मंदिराकडे भाविकांनी येवू नये, म्हणून पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.

निरोगी दिवस लवकर येऊ दे.

मुक्ताई यात्रोत्सव निमित्त गाजबजणारे बोदवड रोडवरील नवे मुक्ताई मंदिर, श्रीक्षेत्र कोथळी येथील जुने मुक्ताई मंदिर परिसरातील भाविकांची गर्दी आणि यात्रेसाठी आलेल्या भाविकांची शहरातील प्रचंड वर्दळ आतापर्यंत अखंडपणे दरवर्षी पहायला मिळत होती. यंदा मात्र मंदिरे आणि शहर मात्र सुनेसुने होते. टाळ मृदुंगाच्या गजराने मंत्रमुग्ध होणारा हा दिवस आज निरव शांत होता. मुक्ताईचा तो जयघोष ऐकण्यासाठी कान आतूर होते. प्रत्येकाच्या मनोमनी मुक्ताईला घरूनच साकडे घालत होते ते की आदी शक्ती महामारी चे हे संकट टळू दे आणि पुन्हा ते निरोगी दिवस लवकर येउ दे.

दरम्यान आज पहाटे जुन्या मुक्ताई मंदिरावर प्रातिनिधीक स्वरूपात विश्वस्त संदीप पाटील यांनी तर नव्या मुक्ताई मंदिरावर पंजाब राव पाटील यांनी सपत्निक मुक्ताई महापूजा केली.

Web Title: On the day of the pilgrimage, the Muktai area was covered with gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.