फत्तेपूर येथील बाजारपेठेतील जलकुंभात आढळल्या मेलेल्या पाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 01:27 AM2018-12-09T01:27:18+5:302018-12-09T01:28:33+5:30

फत्तेपूर येथील बाजार पेठेत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मेलेल्या चार ते पाच पाली आढळून आल्या असून यामुळे दूषीत बनलेले पाणी पिण्यात आल्यामुळे माजी उपसरपंचाची प्रकृती अस्वस्थ बनली.

 Dead Shot found in Jalkundbhai Market in Fatepur | फत्तेपूर येथील बाजारपेठेतील जलकुंभात आढळल्या मेलेल्या पाली

फत्तेपूर येथील बाजारपेठेतील जलकुंभात आढळल्या मेलेल्या पाली

Next
ठळक मुद्देमाजी उपसरपंचाला हलविले जामनेर उपजिल्हा रुग्णालयातप्राथमिक आरोग्य केंद्राने घेतले पाण्याचे नमुने

फत्तेपूर.ता. जामनेर : येथील बाजार पेठेत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मेलेल्या चार ते पाच पाली आढळून आल्या असून यामुळे दूषीत बनलेले पाणी पिण्यात आल्यामुळे माजी उपसरपंचाची प्रकृती अस्वस्थ बनली. त्यांच्यावर येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जामनेर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
फत्तेपूर येथे बाजार पेठेत पाण्याची टाकी बांधलेली असून त्या टाकीमधील पाणी परिसरातील शेकडो लोक दररोज पीत असतात. ८ रोजी दुपारी येथील माजी सरपंच ईश्वरसिंग उमरावसिंग पाटील यांनी त्याच टाकीतील पाणी प्याले असता त्यांना अचानक मळमळायला लागून त्यांना
उलट्या सुरू झाल्या. त्यांना लगेचच प्रा.आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आणि याठिकाणी प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी १०८ या रूग्णवाहिकेने जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आले.
दरम्यान, सदर पाण्याची टाकी उघडून पाहिली असता टाकीच्या तळाशी ३ ते ४ मेलेल्या पाली दिसल्या व दोन- तीन पाली मेलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगत असतांना दिसल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राने या गंभीर बाबींची दखल घेत टाकीतील पाण्याची तपासणी करून नमुना घेतला. या प्रकारामुळे या परिसरातील जनता भयभीत झालेली आहे. तर पाणी पुरवठा करणा-या कर्मचा-यांच्या कार्यक्षमतेचे वाभाडे जनतेसमोर उघडे पडलेले असून त्यांच्या कामाविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

Web Title:  Dead Shot found in Jalkundbhai Market in Fatepur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी