विधी प्रशाळेतील तीन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशास ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 08:18 PM2020-12-17T20:18:02+5:302020-12-17T20:18:35+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी प्रशाळेतील तीन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशास ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात ...
Next
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी प्रशाळेतील तीन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशास ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विधी प्रशाळेत इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स, बायो फॉरेन्सिक लॉ ॲण्ड बायो टेरेरिझम आणि मेडिकल ज्युरीस्प्रूडन्स ॲण्ड टॉक्सिकोलॉजी या तीन पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या मागणीवरून ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन प्रवेशाची माहिती विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती विधी प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ. एस.आर. भादलीकर यांनी दिली आहे.