पुरस्कार प्रस्तावासाठी ३० जूनपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:41+5:302021-05-23T04:15:41+5:30
ऑनलाईन मार्गदर्शन सत्र जळगाव : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या ...
ऑनलाईन मार्गदर्शन सत्र
जळगाव : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवक, युवतींसाठी २८ मे रोजी भारतीय संरक्षण दलातील विविध संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत करण्यात आले आहे.
पोलिसांना ज्यूस वाटप
जळगाव : युवा सेनेतर्फे चौकाचौकात बंदोबस्त असलेल्या पोलीस बांधवांना उत्साहवर्धक ज्यूस वाटप करण्यात आले. युवा सेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी पियुष गांधी, उपशहर प्रमुख जय मेहता, रोहित शिरसाट, चेतन चौधरी, दर्शन बारी, प्रसाद विसपुते आदी उपस्थित होते.
वाहनधारकांची कसरत
जळगाव : शहरातील रस्त्यांची दुरवस्था होण्यासह आता अनेक भागात रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या कचऱ्यामुळे वाहनधारकांची कसरत होत आहे. त्यात शनिवारी खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली असताना बाजारपेठेतून बाहेर पडताना वाहनधारकांना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यावरून वाहने न्यावे लागली.
रोटरीतर्फे अन्नधान्य वाटप
जळगाव : रोटरी क्लब जळगावतर्फे यशवंतराव मुक्तांगण हॉल, नेरी नाका येथे ५० अंध बांधवांना व २० लोक कलावंतांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. अध्यक्ष जितेंद्र ढाके, सचिव डॉ.काजल फिरके, डिस्ट्रिक सहसचिव डॉ.तुषार फिरके, माजी अध्यक्ष नित्यानंद पाटील, केदारनाथ मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, गौरव लवंगले, होनाजी चव्हाण, रमेश भोळे, विभावरी मोराणकर आदी उपस्थित होते.