३१ मेपर्यंत मालमत्ता करात १० टक्के सूट देण्याची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:15 AM2021-05-16T04:15:37+5:302021-05-16T04:15:37+5:30
जळगाव : महापालिकेच्या माध्यमातून आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करात १० टक्के सूट देण्याची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. ...
जळगाव : महापालिकेच्या माध्यमातून आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करात १० टक्के सूट देण्याची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाइन पध्दतीने तसेच धनादेशाव्दारे पेमेंटचा स्वीकार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी पालिकेने ऑनलाइन पध्दतीचा अवलंब सुरू केला आहे. गेल्या काही दिवसापासून ऑनलाइन पध्दतीने भरणा स्वीकारला जात आहे. १० टक्के सूट मिळण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत देण्यात आली होती. नागरिकांकडून मुदतवाढ मिळण्याची मागणी हाेत हाेती. त्यामुळे पालिकेने १ मे ते ३१ मे पर्यंत मालमत्ता करात १० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला. ऑनलाइन पध्दतीने महापालिकेच्या वेबसाइटवर अथवा धनादेशाव्दारे भरणा स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना मालमत्ता कराच्या रकमेसंदर्भात दिलासा मिळणार असून ३१ मेपर्यंत लाभ घेता येणार आहे.