वाळूमाफियांचा थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 03:36 AM2024-02-07T03:36:10+5:302024-02-07T03:37:12+5:30

नशिराबादची घटना- दोन वाहने पकडल्यावर भिडला जमाव

Deadly attack by sand mafias directly on resident Sub-District Officers | वाळूमाफियांचा थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश

वाळूमाफियांचा थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश

कुंदन पाटील

जळगाव - छ.संभाजीनगर येथे निवडणूक प्रशिक्षणासाठी सर्वच उपजिल्हाधिकारी गेले असताना वाळूमाफियांना संधी मिळाली आणि वाळूचा भयंकर उपसा सुरु करीत वाहतूक सुरु केली. एकमेव निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी धाडसत्र राबविल्यावर क्षणातच दोन डंपर पकडले.या कारवाईला रोखण्यासाठी जमावाने कासार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्यांच्या शासकीय वाहनाची दगडफेक  केल्याची घटना रात्री साडे अकरा वाजता तालुक्यातील नशिराबादनजीक घडली.

या घटनेनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जिल्हाभर नाकाबंदीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कासार यांनी दोन वाहने पकडल्यानंतर वाळूमाफियांचा जमाव त्यांच्याशी भिडला. 

Web Title: Deadly attack by sand mafias directly on resident Sub-District Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.