प्राणघातक खड्डे, नागरिकांच्या जीवांची दखल घेणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:20 AM2021-08-22T04:20:11+5:302021-08-22T04:20:11+5:30
भुसावळ : प्राणघातक खड्ड्यांतून जाताना नागरिकांच्या जीवांची दखल घेणार कोण, जीवघेणे अपघात होतील तोपर्यंत पालिका प्रशासन वाट पाहणार ...
भुसावळ : प्राणघातक खड्ड्यांतून जाताना नागरिकांच्या जीवांची दखल घेणार कोण, जीवघेणे अपघात होतील तोपर्यंत पालिका प्रशासन वाट पाहणार आहे का, असा प्रश्न संतप्त भुसावळकरांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
शहरातील जळगाव रोड महर्षी वाल्मिकी चौक परिसराजवळ कुंभार वाड्याजवळ नवीन बांधण्यात आलेल्या नाल्यावरील पुलाजवळ अक्षरश: खड्डे पडले आहेत.
जळगावकडून येणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे काम तीन महिने आधी करण्यात आले होते. मागील काही वर्षांत याच रस्त्यावर जास्त प्रमाणात अपघात झाले आहेत. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर काही गंभीर जखमीसुद्धा झाले आहेेत. याबाबत जळगाव जिल्हा ग्रामीण सेवा फाऊंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी जावरे यांनी पालिका प्रशासनाकडे तोंडी तक्रार दिली. या परिसरातील नागरिकांची ओरड असूनही, पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.