ऑनलाईन व्यवहार करताहेत; मग खात्यातील पैसे सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:19 AM2021-09-22T04:19:34+5:302021-09-22T04:19:34+5:30

सुनील पाटील जळगाव : कमी श्रमात व बसल्या जागी पैसे कमावण्यासाठी अनेक गुन्हेगार आता मोबाईल, इंटरनेट याचा वापर करु ...

Dealing online; Then manage the money in the account! | ऑनलाईन व्यवहार करताहेत; मग खात्यातील पैसे सांभाळा!

ऑनलाईन व्यवहार करताहेत; मग खात्यातील पैसे सांभाळा!

Next

सुनील पाटील

जळगाव : कमी श्रमात व बसल्या जागी पैसे कमावण्यासाठी अनेक गुन्हेगार आता मोबाईल, इंटरनेट याचा वापर करु लागले आहेत. इंटरनेटमुळे एकीकडे सर्व काही ऑनलाईन होत आहे, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेत आहेत. ओटीपी किंवा आधारकार्ड क्रमांक विचारुन बँकेतून पैसे परस्पर वळविण्याच्या या तक्रारी वाढल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात १२१ गुन्हे दाखल झाले आहेत.

केवायसीच्या नावाने कॉल करुन गोपनीय माहिती विचारली जात असून त्यामुळे क्षणात बँक खात्यातील पैसा वळविला जात आहे. जळगाव जिल्ह्यात सायबर पोलिसांकडे वेगवेगळ्या फसवणुकीबाबत २०१८ ते २०२१ (ऑगस्टपर्यंत) १२१ गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातील ८९ गुन्हे निकाली काढण्यात आले असून ३२ गुन्हे प्रलंबित आहेत. केवायसीसाठी आपल्या मोबाईलवर कुणी लिंक पाठविली असल्यास मोहात पडू नका? याद्वारे आपल्या बॅंकेच्या खात्यातील पैसे गायब केले जाऊ शकतात. सध्या फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार कॉल किंवा एसएमएस करुन लोकांना केवायसी करण्याच्या नावाखाली फसवत आहेत.

सायबर क्राईम वाढतोय

२०१८-१४

२०१९-५८

२०२०-२३

२०२१-२६

८९ तक्रारी काढल्या निकाली

पोलीस दलाच्या सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी १५ दिवसांत निकाली काढण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. आता जिल्ह्यात सायबर सेलकडे ३२ तक्रारी शिल्लक आहेत. त्यात भाग ५ चे १८ तर भाग ६ चे १४ प्रकरणे आहेत. या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र पाठविण्यात आले आहेत. सायबर पोलिसांकडे सर्वाधिक तक्रारी या ऑनलाईन फ्रॉडच्या आलेल्या आहेत. त्यातील आरोपी हे खास करुन झारखंड, दिल्ली, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील असल्याचे आढळून आलेले आहेत.

२०२० मधील सायबर क्राईम

सेक्सटॉर्शन -३

फिशिंग कॉल-३

बनावट अकाउंट-४

बदनामी -४

महिलांचा छळ-३

Web Title: Dealing online; Then manage the money in the account!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.