नगरदेवळा येथील प्रौढाचा लॉजमध्ये मृत्यू
By admin | Published: March 29, 2017 05:45 PM2017-03-29T17:45:45+5:302017-03-29T17:45:45+5:30
नवीपेठेतील गुरुकृपा लॉजमध्ये वास्तव्यास असलेले विलास नारायणसिंग परदेशी (वय-39, रा़ नगरदेवळा ता़पाचोरा) हे बुधवारी सकाळी 8 वाजेच्या लॉजमधील बाथरूमध्ये मयतस्थितीत आढळून आल़े
Next
मृत्यूचे कारण गुलदस्त्यात : पोलिसात अकस्मात मृत्यू दाखल
जळगाव,दि.29- नवीपेठेतील गुरुकृपा लॉजमध्ये वास्तव्यास असलेले विलास नारायणसिंग परदेशी (वय-39, रा़ नगरदेवळा ता़पाचोरा) हे बुधवारी सकाळी 8 वाजेच्या लॉजमधील बाथरूमध्ये मयतस्थितीत आढळून आल़े त्याचे मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही़ याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद नाही़
विलास परदेशी हे नगरदेवळा येथे पत्नी व दोन मुलांसोबत वास्तव्यास आहेत़ ते सांगली येथील खत-बियाण्यांच्या कंपनीत मार्केटींगचे काम करत होत़े या कामानिमित्ताने ते 16 मार्च रोजी जळगावात आले होत़े नगरदेवळा ते जळगाव प्रवासाची अडचण असल्याने ते व.वा.वाचनालय परिसरातील गुरुकृपा हॉटेल येथे लॉजिंगमध्ये थांबले होत़े
हॉटेलमधील कर्मचारी अजरून राणे यांना बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास परदेशी यांच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला़ खोलीत चौकशी केली असता, बाथरूममध्ये परदेशी पडलेले होत़े त्यांनी तत्काळ व्यवस्थापक गयभू पाटील यांना माहिती दिली़ त्यांनी मालकांना कळविल़े मालक रामकुमार दर्डा यांनी तत्काळ हॉटेल गाठल़े पोलिसांना माहिती दिली व 108 रुग्णवाहिकेला पाचारण केल़े डॉक्टरांनी तपासले असता ते मृत असल्याचे घोषित केल़े
परदेशी यांच्या मृतदेहाजवळ मद्याची बाटली मिळून आली़ रूमधील कपडय़ाची बॅग पोलिसांनी जप्त केली आह़े त्यात आढळून आलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारावर पोलिसांनी परदेशी यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला़ ते खते सांगली येथील खते कंपनीत कामाला असून कंपनीच्या कामानिमित्ताने जळगावात आले असल्याचे नातेवाईकांनी सांगितल़े