धुळ्यात विजेचा ‘शॉक’ लागून दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 07:13 PM2017-09-11T19:13:12+5:302017-09-11T19:19:36+5:30
मंदिराला रंग देत असताना चितोड रस्त्यावरील रंगारी चाळीत घडली घटना
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.11 - शहरातील चितोड रोडवर असलेल्या रंगारी चाळ परिसरात मंदिराला रंग देत असताना उच्च दाबाच्या वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने शॉक लागून गोरख पांडुरंग बोरसे (वय 25) आणि बादल नामदेव मोरे (वय 19) दोघे रा़ जमनागिरी रोड, धुळे या दोघांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली.
रंगारी चाळीजवळ श्री चिंचणी मायाक्का मंदिराला नवरात्रीनिमित्त रंग देण्याचे काम सुरू होत़े दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मंदिराला रंग देत असताना मंदिरावरून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीला रंग देणा:या तरुणांचा स्पर्श झाला़ या घटनेत गोरख पांडुरंग बोरसे (वय 25) आणि बादल नामदेव मोरे (वय 19) दोघे रा़ जमनागिरी रोड, धुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला़ तर नितीन (मेजर) हे जखमी झाल़े या घटनेनंतर लागलीच वीजपुरवठा खंडित करून तरुणांना रुग्णालयात नेण्यात आल़े त्यांना मृत घोषित करण्यात आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आल़े या घटनेनंतर संबंधित तरुणांचे नातेवाईक व परिसरातील नागरिक अशा 100 ते 150 जणांनी शहर पोलीस ठाणे गाठून आर्थिक मदत देण्याची मागणी केली़ त्यानुसार महावितरणचे शहर अभियंता किसन पावरा यांनी शहर पोलीस ठाण्यात येऊन नातेवाईकांचे सांत्वन केल़े तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा-दहा हजार रुपये मदत देणार असल्याचे जाहीर केल़े