जळगावच्या काकू -पुतण्याचा पुणे येथे कार अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:26 PM2018-09-15T12:26:50+5:302018-09-15T12:27:26+5:30

३ जण जखमी

Death of a car accident in Pune, Jalgaon's Kaku-Poot | जळगावच्या काकू -पुतण्याचा पुणे येथे कार अपघातात मृत्यू

जळगावच्या काकू -पुतण्याचा पुणे येथे कार अपघातात मृत्यू

Next
ठळक मुद्देमहामार्गावरील मोठा दगड चुकविताना झाला अपघात१९ दिवसांपूर्वीच घेतली नवीन कार

जळगाव : हॉटेलमध्ये जेवण करून पुणे येथे घराकडे येत असतार्ना महामार्गावर पडलेला मोठा दगड चुकविताना झालेल्या अपघातात राजेंद्र प्रकाश पाटील (वय-३०) व संध्या दिलीप पाटील (रा़ दोन्ही रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) या दोघांचा मृत्यू झाला़ तर कारमधील अन्य ३ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे़
हा अपघात नारायणगावनजीक १३ सप्टेंबर रोजी रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेमुळे शहरातील रामेश्वर कॉलनीत शोककळा पसरली होती़
१९ दिवसांपूर्वीच घेतली नवीन कार
राजेंद्र पाटील हा गेल्या काही दिवसांपासून पुण्याला नातेवाईकांकडे वास्तव्यास होता़ काही महिने खाजगी काम केल्यानंतर २५ आॅगस्ट रोजी राजेंद्र याने नवीन कार खरेदी केली आणि ती भाडेतत्वावर एका कंपनीत देऊन स्वत:च त्यावर चालक म्हणून काम करायचा़ राजेंद्र याची काकू संध्या पाटील यांची मुले पुण्याला नोकरीला असल्यामुळे त्या कधी पुण्यात तर कधी जळगावात राहत होत्या़ सध्या त्या पुण्यात राजगुरूनगरला वास्तव्यास होत्या़
या भीषण अपघातात चालक राजेंद्र व संध्या पाटील यांचा जागीच मृत्यू झाला़ तर कारमधील अन्य तिघे जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर नारायण गावाजवळील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे़ राजेंद्र याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील तसेच दोन भाऊ असा परिवार आहे़ तर संध्या पाटील यांच्या पश्चात पती, मुले असा परिवार आहे़
श्रध्दांजली फलक लावले
राजेंद्र हा मनमिळावू आणि सर्वांचा लाडका असल्यामुळे त्याला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी रामेश्वर कॉलनीतील विविध भागात श्रध्दांजली फलक मित्रमंडळींकडून लावण्यात आले होते़ राजेंद्र हा आपल्याला सोडून गेल्याचा धक्का मित्रांना बसला होता़
रामेश्वर कॉलनी परिसर शोकाकूल
एकाच कुटूंबातील दोन जणांना मृत्यू झाल्यामुळे रामेश्वर कॉलनी परिसर शोकाकूल झाला होता नातेवाईकांसह रहिवाश्यांची प्रचंड गर्दी झालेली होती़ मयत संध्या पाटील यांचे पती दिलीप पाटील हे महानगरपालिकेत नोकरीला आहेत़ सायंकाळी काही मनपा अधिकारी व कर्मचारी देखील रामेश्वर कॉलनीत जाऊन मयतांच्या नातेवाईकांची व कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले़ प्रचंड आक्रोश यावेळी सुरू होता़ दरम्यान, वेगवेगळी अपघातची कारणे समोर आली़ ते जेवणाला गेले होते असे काहींचे म्हणणे होते़ तर काहींनी सांगितले की, गणपती पुळे या ठिकाणी देवदर्शनला गेले होते़ तेथून येत असताना हा अपघात झाला़
जेवणाला गेले अन् अपघात झाला
१२ सप्टेंबर रोजी राजेंद्र याच्या चुलत भावाचा मुलाचा वाढदिवस होता़ त्यामुळे १३ सप्टेंबर रोजी रात्री राजेंद्र याच्यासह काकू, काकांची दोन मुले व आत्याचा मुलगा हे कारने (क्र. एमएच़१४़जीयू़६५१२) पुण्यातील नारायण गावाकडे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले़ रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास जेवण करून घराकडे निघाले़ महामार्गावर चौपदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मोठे दगड रस्त्यावर होते. त्याचा अंदाज न आल्याने राजेंद्र याने दगड चुकविण्यासाठी वळण घेतले. यावेळी कार दगडावर आदळून उलटली व खड्ड्यात कोसळली.
रामेश्वर कॉलनीत प्रचंड आक्रोश
मध्यरात्री झालेल्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली़ नातेवाईकांसह रामेश्वर कॉलनीतील कुटुंबीयांना शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास अपघाताची माहिती कळताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. यानंतर सकाळी रामेश्वर कॉलनीत नातेवाईकांची प्रचंड गर्दी झालेली होती़ मुलाच्या मृत्यूमुळे राजेंद्रच्या आई-वडीलांना धक्का बसला़ राजेंद्र हा मित्रांचा लाडका असल्यामुळे रात्रीपासूनच मित्रांनी गर्दी केली होती़
मनपा कर्मचाºयांनी घेतली धाव
अपघातातील मयत महिला संध्या पाटील या मनपातील सुवर्ण जयंती विभागातील लिपीक दिलीप सोनवणे यांच्या पत्नी आहेत. त्या पुतण्याबरोबर बाहेरगावी होत्या. परतत असताना अपघात झाला. या अपघाताबाबत माहिती मिळताच महापालिकेतील कर्मचाºयांनी दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी धाव घेऊन त्यांचे सात्वन केले.

Web Title: Death of a car accident in Pune, Jalgaon's Kaku-Poot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.