चक्कर येऊन कोसळल्याने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 07:33 PM2017-09-28T19:33:52+5:302017-09-28T19:41:32+5:30
शिरसोली रस्त्यावरील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी शुभम सुनील गुरव (वय २३, रा.श्रीधर नगर, जळगाव) महाविद्यालयाच्या वाहनतळात दुचाकी लावल्यानंतर रस्त्याने चालत असताना अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. त्यात त्याच्या मेंदूला मार बसल्याने मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी ११.२० वाजता घडली. या घटनेचे वृत्त शहरात वाºया सारखे पसरले. कुटुंबीयांना व मित्रांना जबर धक्का बसला. त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. दरम्यान, शुभमवर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२८ : शिरसोली रस्त्यावरील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी शुभम सुनील गुरव (वय २३, रा.श्रीधर नगर, जळगाव) महाविद्यालयाच्या वाहनतळात दुचाकी लावल्यानंतर रस्त्याने चालत असताना अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. त्यात त्याच्या मेंदूला मार बसल्याने मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी ११.२० वाजता घडली. या घटनेचे वृत्त शहरात वाºया सारखे पसरले. कुटुंबीयांना व मित्रांना जबर धक्का बसला. त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. दरम्यान, शुभमवर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
जमिनीवर कोसळला अन् बेशुद्ध पडला
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुभम हा बी.ई.सिव्हीलच्या शेवटच्या वर्षाला होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजता तो दुचाकीने महाविद्यालयात गेला. वाहनतळात दुचाकी लावल्यानंतर महाविद्यालयात जात असतानाच त्याला चक्कर आली. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. जागेवरच बेशुध्द पडल्याने विद्यार्थ्यांनी तातडीने शिक्षकांना बोलावले. प्रा.आर.के.तिवारी, प्रा.एस.एन.पवार व विद्यार्थ्यांनी त्याला महाविद्यालयाच्या वाहनातून जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. वाहनात असतानाच प्राध्यापकांनी शुभमचे वडील सुनील गुरव यांना घटनेची माहिती दिली.
दवाखान्यात १०.२० वाजता दाखल अन् ११.२० ला मृत्यू
शुभम याला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरु असताना तासाभराने म्हणजेच ११.२० वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मुलाच्या तब्येतीची माहिती मिळाल्यानंतर वडील सुनील गुरव व आई अर्चना गुरव यांनी तातडीने दवाखाना गाठला. मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच आईने जोरदार हंबरडा फोडला तर वडिलांनाही हुंदके आवरणे कठीण झाले. दोघांची अवस्था पाहता अन्य प्राध्यापकांनी त्यांना धीर देत तातडीने घरी रवाना केले.
आज होणार अंत्यसंस्कार
शुभम याची आत्या व अन्य नातेवाईक अहमदाबाद, बडोदा यासह लांबच्या शहरात असल्याने शुक्रवारी सकाळीच शवविच्छेदन होऊन अंत्यसंस्कार होतील. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी यांनी पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात हलविला.
शुभम अत्यंत हुशार विद्यार्थी
शुभम बी.ई.सिव्हीलच्या शेवटच्या वर्षाला होता. अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून तो परिचित होता. एका विषयात त्याला गुण कमी मिळाल्याने त्याने पेपर तपासणीचा अर्ज केला होता. त्यात त्याला गुण वाढवून मिळाले होते, अशी माहिती प्रा.आर.के.तिवारी यांनी