डोळ्यासमोर पाहिला साक्षात मृत्यूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:48 PM2020-02-03T12:48:54+5:302020-02-03T12:49:06+5:30

जळगाव : नदीतून पाणी घेऊन येत असताना अचानकपणे हिंस्त्र प्राण्याने हल्ला चढविला.प्रतिकार करताना ताकद कमी पडली. हा प्राणी त्याच्या ...

 Death is the first sight seen | डोळ्यासमोर पाहिला साक्षात मृत्यूच

डोळ्यासमोर पाहिला साक्षात मृत्यूच

Next

जळगाव : नदीतून पाणी घेऊन येत असताना अचानकपणे हिंस्त्र प्राण्याने हल्ला चढविला.प्रतिकार करताना ताकद कमी पडली. हा प्राणी त्याच्या तोंडाने वारंवार गळ्याचा घोट घेण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र कधी हात तर कधी डोकं आडवे लावून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. डोक्यावरचा रुमाल गळ्याच्या भोवती लावला. तरीही तो रुमाल त्याने फाडून फेकला, शेजारी मजुर धावून आल्याने सुटका झाली. या मजुराला यायला पाच मिनिटे उशीर झाला असता तर या प्राण्याने जीव घेतला असता...अशी अंगाचा थरकाप उडविणारी आपबिती हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संजय तोताराम सपकाळे (४५, रा.भोलाणे, ता. जळगाव) यांनी सांगितली.
शनिवारी सकाळी भोलाणे, देऊळवाडे व कानसवाडे येथील पाच शेतमजुरांवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली होती. दुपारी गावकऱ्यांनी या प्राण्याला ठार मारले. हा प्राणी कोणी तडस तर कोणी लांडगा सांगत असला तरी संजय सपकाळे यांच्यामते हा वेगळाच प्राणी असून प्रथमच असा प्राणी पाहिला आहे. मानवाचे रक्त या प्राण्याचे मुख्य खाद्य असल्याचे जाणवले.
सरकारी मदत नाहीच
ही आपबिती सांगत असताना जखमी मजुर व त्यांच्या कुटुंबियाला रडू कोसळत होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेटी दिल्या, चौकशी केली. मदत करु म्हणून सांगितले, मात्र कोणतीच मदत प्रत्यक्षात मिळालेली नव्हती.

थरारक झुंज आणि मजुरांची बोटे खाल्ली
संजय सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंस्त्र प्राण्याने डोक्यावर पंजा व तोंडाचे दात लावून रक्त ओढले. त्यामुळे प्रचंड खोलवर जखम झाली. गळ्यातून रक्त ओढण्याचा वारंवारचा प्रयत्न पाहून डोक्यावर चुंभळ म्हणून घेतलेला रुमाला गळ्याच्या भोवती लावला. ही झुंज पाहून शेजारच्या शेतातील विलास तुळशीराम कोळी यांनी धाव घेतली. संजय यांची सुटका करताना या प्राण्याने विलास यांच्या हाताचे एक बोट तोडले..दोघंही रक्तबंबाळ अवस्थेत पळत सुटले. विलास यांनी मोठा दगड या प्राण्याच्या दिशेने भिरकावला तो जोरात लागल्याने त्याने तेथून पळ काढला. या हल्ल्यात आपण डोळ्यासमोर साक्षात मृत्यू पाहिला. पुढे रस्त्यात शेतात वांगे तोडत असलेल्या लक्ष्मण श्यामराव कोळी (भोलाणे) यांच्यावर त्याने हल्ला चढविला. हा हल्ला परतवून लावताना या प्राण्याने लक्ष्मण यांच्या हाताची तीन बोटे खाल्ली. या घटनांमुळे या मजुरांना कायमस्वरुपी बोटाचे अपंगत्व आले आहे.
 

Web Title:  Death is the first sight seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.